सोलापूर : “मी सावरकर नाही, मी गांधी आहे असं राहुल गांधी आहे” असं काँग्रसेचे नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनासाठी भाजपकडून सावरकर गौरव यात्राही काढण्यात आली. त्यामुळे भाजपने हा वाद राजकीय केला आणि त्यावरून राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला. भाजपन गौरवयात्रा काढली असली तरी त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आंदोलन केले होते. त्यावेळेपासून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे.
विरोध आणि समर्थन असं दोन्ही होत असताना काँग्रेसचे माजी खासदार आणि नियोजन मंडळाच सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांची सावरकर यांच्याविषयी भूमिका मांडली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांची बाजून अनेक काँग्रेस नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बोलताना सांगितले की, सावरकर जेलमध्ये असताना त्यांचे आणि कुटुंबियांचे जे हाल झाले होते. त्याबद्दल काँग्रेसला कृतज्ञता वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याची टीकाही करण्यात येत होती. त्यातच मालेगावमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याविषया वर बोलताना डॉ. मुणगेकर यांनी सांगितले की, सावरकर यांचा मुद्दा हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही, त्यामुळे सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मी सावरकर नाही, मी गांधी आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. सावरकर यांनी जशी माफी मागितली होती तशी मी माफी मागणार नाही असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं होतं अशी बाजू भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी मांडली आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चालू असतानाच खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी त्या पाठीमागची वस्तुस्थितीही सांगितली आहे.
त्यावरून ते म्हणाले की, सावरकरांनी माफी मागितली यामध्ये सावरकरांचा अपमान नसून ती वस्तुस्थिती सांगितली आहे असं मतही त्यानी यावेळी मांडले. याचा अर्थ सावरकरांनी 1911 मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सेल्युलर जेलमध्ये जाणे ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही अशा शब्दात त्यांनी सावरकर यांचे मोठेपणही त्यांनी बोलून दाखवले आहे.
पण त्या सर्व प्रक्रियेमध्ये सावरकरांनी सहा वेळा माफी मागितली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे हे नाकारून चालत नाही असाही त्यांनी यावेळी इतिहासातील ती घटना समजून सांगितली. दरम्यान, सावरकरांनी सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना 11 वर्षे तिथे ठेवण्यात आले होते. 1921 ते 1924 या काळात सावरकर येरवड्याच्या जेलमध्ये होते.
तिथपर्यंत सावरकरांचे जे काही हाल झाले होते. त्यांच्या कुटुंबियांचे जे हाल झाले,या सगळ्या बाबतीमध्ये काँग्रेसलासुद्धा कृतज्ञता वाटते हीपण वस्तुस्थिती आहे असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. मात्र जशी ही एक बाजू आहे, तशी सावरकरांनी जी माफी मागितली त्याप्रमाणे 1929 पासून 1937 पर्यंत महिन्याला 60 रुपये पेन्शन घेतली होती ही सुद्धा एक बाजू आहे ही घटनाही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी समजून सांगितली.