Solapur Crime : सोलापुरातील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा; महिलेला जीवे मारण्याचाही केला प्रयत्न

| Updated on: Feb 19, 2022 | 11:42 PM

काही दिवसांपूर्वी पिडीत महिलेचा पती आणि नगरसेवक शेजवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्या रागातून नगरसेवक मनोज शेजवाल व त्यांच्या तीन साथीदारांनी पिडीत महिलेला जबरदस्तीने एका गाडीत घातले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर तिचा विनयभंग करून तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Solapur Crime : सोलापुरातील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा; महिलेला जीवे मारण्याचाही केला प्रयत्न
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर : वैजापूरमधील शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरातील शिवसेना नगरसेवका (Shivsena Corporator)ने एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नगरसेवकाने महिलेचा विनयभंग (Molestation) केला आणि नंतर अपहरण करून तिला विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी खळबळजनक बाब उजेडात आली आहे. मनोज शेजवाल असे आरोपी शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप गंभीर असल्याने ते अडचणीत सापडले आहेत. Shiv Sena corporator in Solapur charged with molestation, He also tried to kill the woman)

नगरसेवक मनोज शेजवालांसह चौघांवर गुन्हा दाखल

एका महिलेचे अपहरण करत तिचा विनयभंग केला तसेच तिला विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला, या आरोपावरून शिवसेना नगरसेवक मनोज शेजवालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. यात नगरसेवक मनोज शेजवालांसह चार जण आरोपी आहेत. नगरसेवक मनोज शेजवाल यांनी स्वतःवरील आरोपांचे खंडन केले आहे. संबंधित महिलेचा पती हा लोकांना ब्लॅकमेलींग करण्यासाठी अशा प्रकारची खोटी तक्रार पोलिस स्टेशनला करतो. यापूर्वीही त्याने अनेकांविरोधात अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा करीत नगरसेवक शेजवाल यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

पीडितेचा पती व नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता वाद

काही दिवसांपूर्वी पिडीत महिलेचा पती आणि नगरसेवक शेजवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्या रागातून नगरसेवक मनोज शेजवाल व त्यांच्या तीन साथीदारांनी पिडीत महिलेला जबरदस्तीने एका गाडीत घातले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर तिचा विनयभंग करून तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीत महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पिडीत महिलेने हा आरोप केला आहे. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरुन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चारही आरोपींना तूर्त अटकेपासून दिलासा

आरोपी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची संपूर्ण पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नगरसेवक शेजवाल यांच्यासह चारही आरोपींना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी तपास सुरु ठेवला आहे. Shiv Sena corporator in Solapur charged with molestation, He also tried to kill the woman)

इतर बातम्या

Hariyana Rape & Murder : हरियाणात अल्पवयीन मुलीची हत्या करुन बलात्कार, दोषींना फाशीची शिक्षा

Chitra Wagh : शिवाजी महाराजांनी या सरकारचा कडेलोट केला असता; महिला मारहाणीवरून चित्रा वाघ संतापल्या