सोलापूरः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) एकनाथ शिंदे गटाने मुंबई-सूरत-गुवाहाटा-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार केले. त्यानंतर शिंदे गटावर शिवसेनेतून प्रचंड टीका करण्यात आली. गद्दार आमदार म्हणत गद्दारीची शिक्का त्यांच्यावर मारण्यात आला. या सगळ्या प्रवासात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर..हा मोबाईलवरचा संवाद प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर शहाजी पाटील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत, त्याच शहाजी पाटील (Rebel MLA Shahaji Bapu Patil) यांच्यावर शिवसेनेचे नेते गणेश हाके (Shivsena Leader Ganesh Hake) यांनी जोरदार टीका केली आहे. बंडखोर आमदारांवर बोलताना त्यांनी सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या बातम्या आल्यावर मला शिंदे गटातील लोकांकडून फोन आला. या सत्तेत सामील व्हा. पण मी गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते गणेश हाके यांनी बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, गद्दार आमदाराने याआधी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 550 कोटींचा निधी आणला आणि त्यानंतर आणि काही दिवसात हा गद्दार आमदार सांगतोय की, आम्हाला उद्धव ठाकरे आम्हाला भेट देत नाहीत अशी सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली.
गणेश हाके यांनी आमदार शहाजी यांच्यावर टीका करताना सांगितले की, ज्या शहाजी पाटलांनी मला घर नाही, बायकोला साडी नाही त्या शहाजी पाटलांनी सांगोल्याच्या पाणी प्रश्नावर एकही मोर्चा काढला नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तर त्याचवेळी गणेश हाके यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीकाकेली त्यांच्या टीका करताना ते म्हणाले की, एक आमदाराशिवाय मी आदित्य ठाकरेला ओळखत नाही, त्याला सांगू इच्छितो की तुला आमदार उद्धव ठाकरे यांनी केले आणि हा सांगतोय मी ओळखत नाही म्हणत त्यांच्यावर गणेश हाके यांनी सडकून टीका केली.
शिवसेनेतून ज्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमत्री पदावरुन पायउतार केले त्या आमदारांना आव्हान देत गणेश हाके यांनी सांगितले की, शिवसेनेला नंबर एकला नेऊन नाही ठेवले तर नाव सांगणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.