सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि शिवसेना, भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांच्याकडून सातत्याने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जाते. मात्र त्यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेत्यांनी आता नितेश राणे यांच्यासह राणे कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे सोलापूरातील नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना शरद कोळी यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना जशास तशा भाषेत उत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर नपुसक असल्याची जहरी टीका केली होती, त्यावरूनच शरद कोळी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
यावर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांना नपुंसक म्हणायला नित्या राणे खासदार राऊत तुझ्या घरी आले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
नितेश राणे यांच्यावर टीका करताना, तुम्ही कोणाला दम देत आहात . संजय राऊतसाहेब हे मर्द आहेत म्हणून ते 100 दिवस जेलमध्ये राहिले होते असा घणाघात त्यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.
तर संजय राऊत यांच्याविरुद्ध तुम्ही राणे कंपनी आहात. नित्या तू ईडी आणि भाजपच्या दबावाला घाबरून भाजपत प्रवेश केला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे नितेश राणे तुमच्या भुरट्या दादागिरीला ते घाबरणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यांच्या उंचीवरूनही त्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. दीड फुट्या नित्या 3 महिन्यात मविआ सरकार सत्तेत येणार आणि तुला जेलमध्ये टाकणार असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
संजय राऊत साहेबांच्या तंगड्या तोडण्याचा विचार तुझ्या मनात आल्यावर शिवसैनिक तुझे दोन्ही तंगड्या तोडतील असा घणाघातही शरद कोळी यांनी त्यांच्यावर केला आहे.
राणे तुझ्यात दम असेल तर सिक्युरिटी काढून मैदानात ये मग कोणाच्या मनगटात नेट आहे ते बघू अशा शब्दात शरद कोळी यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
त्यामुळे नितेश राणे तुझा हिशोब व्याज, मुद्दलासह घेतल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही अशी टीका करत त्यांनी नितेश राणे यांना मैदानात या मग बघू असा इशारा त्यांनी दिला आहे.