सोलापूर : ‘बापरे’ शब्दाचा खरा अर्थ जर जाणून घ्यायचा असेल, तर मग या बातमीतलं सीसीटीव्ही फुटेज (Accident CCTV Video) तुम्हाला पाहावंच लागेल. पान टपरीवर लोकं पान घेण्यासाठी येतात. चालत येतात. काही जण बाईकवरुन येतात. काही सायकलवरुन तर काही रीक्षानंही येत असतील. पण थेट ट्रक (Truck Accident) पान टपरीवर पान खायला कसा काय येईल ना? अगदी बरोबर! पण सोलापुरातल्या (Solapur Accident) एका पान टपरीवर असा ट्रक थेट पान टपरीवर घुसल्याचं दिसून आलंय. ही धक्कादायक घटने तिसऱ्या डोळ्यानं टिपली. अंगावर काटा आणणारा ही घटना पाहून सगळ्यांच्यात काळजाचा ठोका चुकला. घटना सोलापूरच्या अक्कलकोटमधील विकास हॉटेलजवळच्या पान टपरीवरची आहे. ट्रक थेट पान टपरीवर घुसला आणि थांबला. नेमका कोणत्या कारणामुळे ट्रक अशाप्रकारे घुसला हे काही कळायला मार्ग नव्हता. यानंतर आजूबाजूला एकच खळबळ उडाली होती.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाला. या व्हिडीओमध्ये नेहमीप्रमाणे पान टपरीवर काही ग्राहकांची ये जा आहे. एक तरुण दुकानाच्या एका बाजूला पाणी पितोय. काही जण दुकानाच्या समोर असलेल्या रिक्षाच्या अगदी विरुद्ध उभे आहेत. सुरुवातील काहीच हालचाल नाही. लोकांची नियमित ये-जा दिसून येते.
काही वेळानं रिक्षाच्या समोर उभ्या असलेल्यांना काहीतरी जाणवतं. ते थबकतात. आजूबाजूला होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एक भरधाव ट्रक वेडावाकड्या अवस्थेत येताना दिसतो. ते बाजूला होता. पण दुकाना असलेल्यांना काय माहिती की हा ट्रक दुकानात घुसणार आहे ते?.. दुकानातील आणि दुकानासमोरील ग्राहक निर्धास्त असतात. त्यांना याप्रकराची काहीच जाणीव नसते. पण अचानक पापणी लवण्याच्या आत ट्रक भरधाव वेगानं येतो आणि थेट पान टपरीमध्ये घुसते. ही घटना पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोकाच चुकतो.
अक्कलकोट शहार घडलेल्या या घटनेनंतर काही काळ बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पण ज्या पद्धतीनं हा ट्रक पान टपरीमध्ये घुसला, ते पाहून सगळेच थबकले. पान टपरीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमकी ही घटना कशामुळे घडली, हे समजू शकलेलं नाही. मात्र एका तरुणाच्या थेट अंगावरच हा ट्रक आल्यानं त्याची घाबरगुंडी उडाली होती. वेळीच हा तरुण टपरीवरच्या टेबलावर जाऊन बसल्यानं तो थोडक्यात बचवला.
या घटनेनं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. खरंत वेळोवेळी वेगवेगळे सीसीटीव्ही आणि त्यात कैद झालेला थरार समोर येत असतो. मात्र या घटनांनी सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. कोणत्याही क्षणी मृत्यू गाठू शकतो. त्यामुळे गाफील न राहता खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे, हे या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय.