सोलापूरः मंदिरावर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठवलेले भोंगे लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास दिला जातोय, असा आरोप भाजप (BJP) आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोलापूरमधील विविध मंदिरांना भोंगे पाठवले आहेत. कंबोज यांच्या आवाहनानंतर जुनी पोलीस लाइन भागातील पावन मंदिरासाठी भाजप नेते किरीण पवार यांनी त्यांच्याकडे भोंग्याची मागणी केली. त्यानंतर हे भोंगे आले. या भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील विविध मंदिरावरही भोंगे लागले. मात्र, आता मंदिरावर भोंगे लावल्यानंतर ते काढण्यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. देशमुख म्हणाले, आमच्याकडे असलेले भोंगे हे जुनेच आहेत. मात्र, केवळ भाजप नेत्यांनी हे भोंगे लावलेत म्हणून पोलिसांनी त्रास देणे चुकीचे आहे. स्वतः भोंगे काढू शकत नसल्याने पोलिसांकरवी भोंगे काढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिले आहे.
भोंग्याविषयी काल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. यानंतर ते म्हणाले की, बैठकीत अतिशय साधकबाधक चर्चा झाली. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच प्रयत्न करावेत, त्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलो आहोत. आता प्रश्न असा आहे की, लाउडस्पीकरचा वापर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये निर्णय दिला आहे. त्यानंतर सुद्धा अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आहेत. त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकराने 2015 ते 2017 या कालावधीत काही जीआर काढले आहेत. त्याच्या आधारे लाउडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी-शर्थी, वेळ आणि डेसिबलच्या आवाजाची मर्यादा या गोष्टी स्पष्ट केल्यात. त्याच्या आधारे आजपर्यंत हा वापर सुरू आहे. यात काही बदल करायचा असल्यास केंद्र सरकराने सर्व देशासाठी एक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!