“हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लढ रहा हूं और लढता रहुंगा”; गांधी विरुद्ध सावरकर या शहरात पोस्टरवॉर रंगले…

| Updated on: Apr 01, 2023 | 8:11 PM

सोलापुरात उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने सावरकर गौरव यात्रेचेदेखील काँग्रेसच्या बॅनर शेजारीच लावण्यात आले आहेत. तर भाजपा विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या बॅनरबाजीमुळे सोलापूर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लढ रहा हूं और लढता रहुंगा; गांधी विरुद्ध सावरकर या शहरात पोस्टरवॉर रंगले...
Follow us on

सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने शिक्षा ठोठवल्यानंतर आणि खासदारकी रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने सावरकर यांच्या नावावर राजकारण करायला सुरुवात केली. त्यामुळेच आता भाजप आणि काँग्रेसचे आता राजकीय युद्ध रंगले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात सोलापूरात जोरदार आंदोलन करण्यात आले होते.

तर त्या आंदोलनाला उत्तर म्हणून काँग्रेसकडूनही राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे आंदोलन वॉर चालू असताना पोस्टरयुद्धही रंगले आहे.

YouTube video player

सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपचे बॅनर वॉर पाहायला मिळत असून भाजप आणि काँग्रेसने दोन्ही पक्षाने आपापल्या पक्षाची पोस्टर लावून एकमेकांवर टीका केली आहे.यामध्ये राहुल गांधी यांच्या बॅनर शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले.

दरम्यान सोलापुरात उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने सावरकर गौरव यात्रेचेदेखील काँग्रेसच्या बॅनर शेजारीच लावण्यात आले आहेत. तर भाजपा विरुद्ध काँग्रेस पक्षाच्या बॅनरबाजीमुळे सोलापूर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

“हिंदुस्तान के लोकतंत्र के लिए लढ रहा हूं और लढता रहुंगा” अशा आशयाचा काँग्रेसच्या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला “हिंदूसंघटक सावरकर जी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान” अशा आशयाचाही बॅनर लावण्यात आला आहे. सोलापूर शहरातील पोटफाडी चौकामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आला आहे.