सोलापूर : करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना येथे काम करताना दोन कामगार जखमी झाले आहेत. राजेंद्र रामचंद्र नलवडे (वय 49, रा. करमाळा) व बबलू कुमार (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. बॉयलरचे गरम पाणी अंगावर पडल्याने हे कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कमलाई साखर कारखाना येथे काम करीत असताना बॉयलरचे पाणी अंगावर पडल्याने हे कामगार जखमी झाले आहेत. त्यांना करमाळा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र येथून त्यांना रेफर करून तीन वाजताच्या सुमारास सोलापूर येथे दाखल केले आहे.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कारखाना बंद करताना हा प्रकार झाला असल्याचे समजत आहे. कारखाना व्यवस्थापनाशी याबाबत संपर्क साधला मात्र अधिकृतपणे यावर कोणीही माहिती दिलेली नाही. साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार कामावर गेले होते. काम करत असताना बॉयलरचे गरम पाणी त्यांच्या अंगावर पडले. त्यामुळे ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारात ही घटना घडली. त्यानंतर जखमी कामगारांना रुग्णालयात करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोन जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. परंतु, कारखाना व्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.