Video: दो पेटी बहुत होते है साहब, उपरसे जो मेसेज आया वही फॉरवर्ड किया, सोलापूर पोलीसांच्या वसुलीचं Sting Operation

| Updated on: Mar 22, 2022 | 5:23 PM

पोलीस आयुक्तालयातून सुरु असलेल्या या वसुलीविषयी अँटी करप्शनला तक्रार केली तर त्यांच्याकडून ही पोलीस आयुक्तालायला मदत होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केला आहे. या स्टिंग ऑपरेशनमधील संवाद हा पोलीस कर्मचारी आणि पत्ते क्लब चालवाणाऱ्या व्यक्तीमधील आहे.

Video: दो पेटी बहुत होते है साहब, उपरसे जो मेसेज आया वही फॉरवर्ड किया, सोलापूर पोलीसांच्या वसुलीचं Sting Operation
सोलापूरमध्ये स्टिंग ऑपरेशनने उघड केले सोलापूर पोलिसांचे वसुलीचे टार्गेट
Follow us on

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांच (Crime Branch)कडून महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याची माहिती एका स्टिंग ऑपरेशन (Sting Operation)मुळे समोर आली आहे. याबाबतची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गृह विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Sting operation in Solapur reveals recovery targets of Solapur police)

सध्या एक ध्वनिचित्रफीत वार्‍याच्या वेगाने पसरत आहे. त्या फितीमध्ये असणारा शहर गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी आणि अवैध धंदेवाला यांच्यातील संवाद ऐकल्यानंतर शहरात गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यास परवानगी दिली जात असल्याची बाब स्पष्ट होत आहे. हा संवाद ‘Tv9’च्या वाचकांसाठी जसाच्या तसा…

धंदेवाला : कैसा करने का साहब?

पोलीस : बोला ना तुम्हारे को…मैं क्या बोलनेवाला… उपरसे जो मेसेज आता है वही मैं फॉरवर्ड करता…

धंदेवाला : दो पेटी बहुत होती साब… दो लाख रुपये..

पोलीस : ओ तो बोलेले है देखो…

धंदेवाला : बहुत होते है शेठ…सनी शिंदेसाब ना… सनीसाब साब बहुत बोले अमाऊंट सनी शिंदेसाब… आपको सोलापूर के बारमे तुमको तो जानकारी है… अण्णा….

पोलीस : है भाई… बस बराबर है… लेकीन उनका कैसा है मालूम है क्या… उनको भी उपर देना पडता है… दुसरा दस तारीख को दोनों जेब मे से दिए है…

धंदेवाला : बापरे…

पोलीस : ए क्या… धंदा कैसा करने का…?

धंदेवाला : साब… ए छोटे मोटे के जो है ना… 30-40 लाख उपर मिलते है…

पोलीस : नही हो रहे साब… नही हो रहे… इसलिए तो ए हो रहा है…

धंदेवाला : साब… मै क्या बोलतू…अण्णा … जहॉंपर जो काम केलिए क्राईम साबसे के लिए पच्चीस हजार जाते वहॉं दो लाख बोले तो कैसा देंगे अण्णा? आदमी धंदा केसे करेगा? पुरी सिटी को देढ लाख जाते…साब… क्राईमवाले साब को पच्चीस हजार सीर फुट्या देखो… क्राईम पीआय को…

पोलीस : मेरा क्या… तुम कितना देना ओ बोलो मै….

धंदेवाला : तुम मुझे कोऑपरेट करना देखो… सनी शिंदे… संदीप शिंदे साब को खाली मेरी रिक्वेस्ट करो

पोलीस : और मै क्या बोलू? मै कैसे कोऑपरेट कर सकता हूँ?

धंदेवाला : अभी कैसा है..? तुम बोलते है उपर फस्ट साब को देना है बोले तो तुम्हारी अमाऊंट बडी है… ओ तुम तुम्हारी जग पे सही है… मै उसके बारे मे ऐतराज नही कर रहा… अभी सोलापूर शहर के जो वाली है ना वाली… दोन नंबर धंदे के बाप बोले तो संदीप शिंदेच है… दुसरा कोनीच नही है… हम इसके लिए साब के पिछे इत्ते लगेले है

पोलीस : बराबर है… सब है… कैसा है मालूम है क्या…?

धंदेवाला : नही उसका…तुम बर्डन कित्ता हो रहा है साब? पाडवी अण्णा ? रुपये के जग अगर पांच रुपये बोले तो आदमी को कितना बडा उसका बर्डन हो रहा है देखो जरा… कहॉं पच्चीस हजार रुपये, कहॉं पांच लाख रुपये… फिर बादमे दो लाख रुपये…डिस्टन्स बडा है अण्णा… मेरे को कुछ तो मार्ग काढने का एक चान्स दो अण्णा…संदीप शिंदेसाब को बोलो अण्णा संदीप शिंदेसाब को

पोलीस : क्या बोलू बोलो तो मै बोलता उनको…

धंदेवाला : मैं तुमको तीस हजार की ऑफर दिया था… अभी पचास की देता लास्ट..

पोलीस : नही होता ओ…

धंदेवाला : दुसरे धंदे चालू है तो उनके पास तो भी भरपूर पैसे आते देखो साब… उनके पास से लाख रुपये लेओ मझे पुछेना उनो कित्ते पैसे देते तो लाख रुपये दिया करके बोलता… दो लाख दिया करके बोलता…

पोलीस : ओ बात नही रहती….

धंदेवाला : देखो साब अभी… पाडवी अण्णा… तुम्हारे पास है… तुम साब को जैसा बोले साब सुनते है देखो…

पोलीस : ए बात बराबर है लेकीन…

धंदेवाला : और संदीप शिंदे साब जैसा बोलेगा वैसा कमीशनर साब सुनते है…इत्ती मुझे गॅरंटी है…फिलहाल दो नंबर धंदे के कौन है बॉस..? एच है… संदीप शिंदे… और दुसरा नामीच नही कही भी..

याबाबत चौकशी समिती नेमली जाणार : पोलिस आयुक्त

पोलीस आयुक्तालयातून सुरु असलेल्या या वसुलीविषयी अँटी करप्शनला तक्रार केली तर त्यांच्याकडून ही पोलीस आयुक्तालायला मदत होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी केला आहे. या स्टिंग ऑपरेशनमधील संवाद हा पोलीस कर्मचारी आणि पत्ते क्लब चालवाणाऱ्या व्यक्तीमधील आहे. दरम्यान, सोलापूर पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी याबाबत चौकशी समिती नेमली जाणार आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

इतर बातम्या

Chandrapur | चितळ शिकार प्रकरण; फरार आरोपीला अडीच वर्षानंतर ठोकल्या बेड्या

Blackmail | मुलीच्या नावे बनावट खाते, अश्लील व्हिडीओ कॉल करुन मेहुण्यांनी तरुणांना लुटलं