सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बद्दल बोलण्याची औकात नाही. राज ठाकरे यांच्या बोलण्याचा विरोधी पक्षांनी विपर्यास केला आहे. जातीय भेद निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आहे असा आरोप मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे (Prashant Gidde) यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यानंतर राज्यातल्या राजकारणाने एक वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील केलेल्या भोंग्याच्या विधानाचा अनेकांनी समाचार घेतला आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना चॅलेज दिलं होतं. अमित ठाकरेंना मशिदींच्या समोर हनुमान चालिसा म्हणायला सांगा. सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्याचं अनेकांनी कौतुक केलं. तर अनेकांनी सुजात आंबेडकरांवरती टीका सुध्दा केली.
सोलापूर जिल्ह्यात अजानचा कर्णा वाजत नाही. त्यामुळे हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रश्नच नाही.जिल्ह्यात मनसेमध्ये अनेक मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी कार्यरत आहेत. पुण्यातील वसंत मोरे,साईनाथ बाबर दोन्ही नगरसेवक नाराज नाहीत.राज ठाकरे हे मोठं नेतृत्व असून सुजात आंबेडकरांची मनसे व राज ठाकरे वर बोलण्याची औकात नाही असं मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गिड्डेनी म्हटलं आहे.शरद पवारांनी जाती जातीचे सेल करुन जातीय भेद निर्माण केला आहे. राज ठाकरे दररोज बाहेर पडले तर अनेकांची पळता भुई थोडी होईल. राज ठाकरेंना देखील इडीची नोटीस आली तरी ते थाटात गेले आणी आले.अनेकजण काळा पैसा कमवून गैरव्यवहार करत आहेत. त्यांना निश्चित शिक्षा व्हायला हवी.भाजपची मनसे बी टीम होत असल्याच्या आरोप गिड्डेनी फेटाळून लावत भाजप बरोबर युती करायला मनसे सैनिकांना आवडेल का ? या प्रश्नावर गिड्डेनी निर्णय राज ठाकरे घेतील तो आम्हांला मान्य असेल.
राज ठाकरेंनी मेळाव्यात मशिदीवरील भोंगे तात्काळ बंद करा. अन्यथा आम्ही मशिदींच्यासमोर हनुमान चाळिसा लावणार असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवरती जोरदार टिका केली.तसेच एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर कोणत्याही कार्यकर्त्यांनी काहीही बोलू नये असा फतवा काढला होता.राष्ट्रवादी पक्षावर टीका केल्यानंतर
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे हे एखाद्या रंग बदलू मनूष्य असल्याचे देखील ते म्हणाले.