सोलापूर : सोलापूरच्या अकलुजमध्ये एका तरुणानं दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला. या लग्नाची चौकशीची परवानगी न्यायालयाकडून नाकारली गेली. रक्ताच्या नातेवाईकांची तक्रार नाही. त्यामुळं तपास करता येत नाही. असं न्यायालयानं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळं दोन मुलींशी लग्न केलं तरी कायदेशीर संकट सध्यातरी टळलंय.
तीन डिसेंबरला हे लग्न झालं. या लग्नाची देशभर चर्चा झाली. अकलुजमध्ये पार पडलेल्या लग्नाची सोशल मीडियावरही चर्चा रंगली. तिघांच्या संसारात सारं काही सुरळीत सुरु होतं. पण, अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. कारण तरुणाविरोधात अकलुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
एकाचवेळी दोन तरुणींशी विवाह केल्यानं अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणात तरुणाला मोठा दिलासा मिळालाय.
दोन तरुणींशी विवाह केल्यामुळं अतुल अवताळे विरोधात एका तरुणानं तक्रार दाखल केली होती.अकलूज पोलिसांनी माळशिरज कोर्टाकडं परवानगी मागितली. तक्रारदारचं लग्न करणाऱ्याशी रक्ताचं नातं आहे का, असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केला.
रक्ताचे संबंध नसल्यानं या प्रकरणात चौकशी पुढं जाऊ शकत नाही. असे निर्देश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानं दिले. कोर्टाच्या या निर्णयामुळं तिघांच्या संसारात आलेलं विघ्न आता टळलंय.
दरम्यान, अरमान मलिक चर्चेत आला. अरमान मलिकच्या दोनही बायका एकाचवेळी प्रेग्नंट आहेत. त्यानं नुसतीच इंस्टावर पोस्ट केली. दोन्ही पत्नींच्या गरोदरपणाची घोषणा केली. अरमानच्या या पोस्टनंतर कुणी त्याचं अभिनंदन करतंय, तर कुणी ट्रोल.