“राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा ठरवला”; या समाजाने पेढे वाटून सरकारचे मानले आभार

| Updated on: Mar 09, 2023 | 7:32 PM

सरकारने आमच्या तीन टक्के लिंगायत बांधवांसाठी स्वतंत्र महात्मा बसवेश्वर महामंडळ निर्माण केल्याबद्दल सरकारला धन्यवाद देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा ठरवला; या समाजाने पेढे वाटून सरकारचे मानले आभार
Follow us on

सोलापूर : शिंदे-फडणवीस सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प मोठ मोठ्या घोषणा करून आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे जाहीर करत अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताच विरोधकांकडून टीका करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे अशा शब्दात अर्थसंकल्पावर टीका केली तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मात्र सोलापूरमध्ये या अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करत पेढे वाटून आनंदर साजरा करण्यात आलाय.

यावेळी सोलापूरातील लिंगायत समाजाने शिंदे-फडणवीस सरकारचे तसेच एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर सोलापूरसह जिल्ह्यातील शिवसेनेच्यावतीने राज्य सरकारने उत्तम बजेट मांडल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

यावेळी सोलापूर शिवसेनेच्यावतीने फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून त्याचा फायदा समाजातील वेगवेगळ्या समुहाला होणार असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

तर शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केल्याचेही सोलापूर शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

तर या अर्थसंकल्पामध्ये महिला, युवा रोजगार व आरोग्याबाबत भरघोस तरतूद केल्याबद्दल सरकारचे आभारही मानण्यात आले आहे.

त्याचबरोबर सर्व जाती-धर्मातील जनतेला न्याय देण्याचे कामही शिंदे-फडणवीस सरकारने केले असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

सोलापूर विद्यापीठाला 50 कोटीचा विशेष निधी, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी तरतूद, महात्मा बसवेश्वर महामंडळाची निर्मिती सह विविध तरतुदी सरकारने केल्याबद्दलही सरकारचे आभार मानण्यात आले आहे.

त्यामुळे सरकारच्या या भरघोस तरतुदींसाठी आम्ही त्यांचे आभार मानत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सरकारने आमच्या तीन टक्के लिंगायत बांधवांसाठी स्वतंत्र महात्मा बसवेश्वर महामंडळ निर्माण केल्याबद्दल सरकारला धन्यवाद देण्यात आले आहेत. तर या महामंडळामुळे लिंगायत समाजातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर गुरव समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द यानिमित्ताने खरा ठरवला असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मागील 35 वर्षापासून गुरव समाजाच्या मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभाव व्यक्त करण्यात आले आहेत.हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सोलापूरमध्ये पेढे भरवत आनंदोत्सवही साजरा करण्यात आला आहे.