सोलापूर – सोलापुरवरून बीडकडे येत असताना उस्मानाबादच्या वाशीजवळ वाहन अडवून बीडच्या (Beed) दाम्पत्यावर शस्त्रधारी हल्ला (Armed attack) करण्यात आलाय. घटना 18 मार्च रोजी सायंकाळी घडलीय. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांनी गाडीवर हल्ला चढविला. एवढंच नाही तर दोघा पती-पत्नीला अमानुष मारहाण केली. या घटनेत वर्षा बडे आणि विलास बडे हे गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या दोघेजण मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. काही वेळानंतर पोलीस दाखल झाले तेंव्हा आरोपींनी पलायन केले. पोलिसांनी (Police) जखमींना रुग्णालयात दाखल केले. आरोपीत महिलांचाही समावेश आहे. विलास बडे हे बीडमध्ये अधिकारी आहेत.
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूरहून बडे दांम्पत्य बीडकडे निघाले होते. प्रवासादरम्यान उस्मानाबाद येथे दाम्पत्यावर15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. चारचाकी वाहनाच्या काचा फोडत त्या दोघांनाही गाडीतून खाली खेचल. त्यानतंर पीडित महिलेच्या ओढणीला धरून मारहाण केली. त्यानंतर तिच्या गळ्यातले हिसकावले. दोघांकडूनही मोबाईल काढून घेतले. हल्लेखोरांकडं बिअरच्या बॉटलसह काठ्या, कोयते यासारखी हत्यारे होती अशी माहिती पीडित महिलेनं दिली आहे. याच दरम्यान हल्लेखोरांनी पीडितांच्या मदतीला आलेल्या दोघांनाही मारहाण केली. मदत करणाऱ्या लोकांनी 112 नंबरल कॉल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. हल्ला करणाऱ्या काही लोकांना तब्यत घेतले. मात्र काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. मात्र पोलिसांच्या सहकार्यामुळे आमचा जीव वाचल्याची माहिती पीडितांनी दिली आहे. या घटनेतील काही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा