लवासाप्रकरणी पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का केली, सोमय्यांचे 3 सवाल

| Updated on: Mar 01, 2022 | 1:29 PM

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, लवासाबद्दल हायकोर्टाचे जजमेंट आले आहे. ज्यांनी हा भ्रष्टाचार केला ते अजित पवार, शरद पवार हे ठाकरेंचे पार्टनर आहेत. आता किरीट सोमय्या शांत बसणार नाही. ज्यांनी लवासाबाबत सत्तेचा दुरूपयोग केला त्यांच्यावर दुन्हा दाखल होईपर्यंत मी गप्प बसणार नाही.

लवासाप्रकरणी पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का केली, सोमय्यांचे 3 सवाल
शरद पवार आणि किरीट सोमय्या.
Follow us on

मुंबईः एकीकडे आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट दिल्लीतून चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले आहेत, हे सुद्धा देशाला कळायला हवं, असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला सोलापूरमधून भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी महाराष्ट्र सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजपचे मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू झाल्याचा प्रतिहल्ला केला. आता या कलगीतुऱ्यामध्ये पुन्हा एकदा आरोपाची राळ महाराष्ट्रभर उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही एंट्री घेतलीय. लवासाप्रकरणी पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली का केली, अशा सवालांच्या फैरी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झाडल्यात.

सवाल क्रमांक 1

किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यातील जनतेला काल कळलं की, नील सोमय्या निर्देष आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी दोषी ठरवले नाही, त्यामुळं त्यांची बदली केली. संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहात हे कबूल करा. कसला गेम बिगीन. ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यांना पेड मीडिया एजन्सी सल्ला देते. मोदी सरकार मागे लागलेय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग, पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली ते सांगा, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला.

सवाल क्रमांक 2

सोमय्या पुढे म्हणाले की, ऊद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. कारण घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात. जे डर्टी डझन घोषित केले आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल त्यांनी केला. श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटकडून पैसा ट्रान्सफर केला, वरूण सरदेसाईचेही पुरावे समोर येतायत, असा दावाही सोमय्यांनी केला.

सवाल क्रमांक 3

सोमय्या म्हणाले की, लवासाबद्दल हायकोर्टाचे जजमेंट आले आहे. ज्यांनी हा भ्रष्टाचार केला ते अजित पवार, शरद पवार हे ठाकरेंचे पार्टनर आहेत. आता किरीट सोमय्या शांत बसणार नाही. ज्यांनी लवासाबाबत सत्तेचा दुरूपयोग केला त्यांच्यावर दुन्हा दाखल होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. दोन गावांचा निर्णय आला आहे. अजून 18 गावे बाकी आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान