गणेश सोलंकी, बुलढाणा | दि. 1 मार्च 2024 : दहावी-बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून त्यासाठी जय्यत तयारी केली गेली. परीक्षा व्यवस्थेपासून प्रश्नपात्रिका संच पोहचवण्यापर्यंत नियोजन केले गेले. परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी भरारी पथके तयार केली गेली. एकीकडे बोर्डाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी झाली असताना दुसरीकडे परीक्षेच्या कस्टडीरुममध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्या शिक्षकावर उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, त्या शिक्षकाने मद्यपान करुन कस्टडीरुममध्ये गोंधळ धातला. बुलढाणा जिल्ह्यातील हा प्रकार उघड झाला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पंचायत समितीत दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी कस्टडी रूम तयार केला गेला आहे. या कस्टडी रुममध्ये एका मद्यधुंद शिक्षक पोहचला. त्याने त्या ठिकाणी चांगलाच गोंधळ घातला. महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाची नियुक्ती वरवट बकाल येथे एका कार्यशाळेत केलेली होती, मात्र हा शिक्षक कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना चांगली शिवीगाळ केली.
वास्तविकता कस्टडी रूम संवेदनशील आहे. कारण या ठिकाणी दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात. या रूममध्ये नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही जाता येत नाही. राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूममध्ये शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत शिक्षक पोहचला. यामुळे कस्टडी रुमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
दहावी, बारावीचे पेपर असलेल्या कस्टीडी रुममध्ये पोहचलेला मद्यधुंद शिक्षक#Exam #SSC #hsc2024 pic.twitter.com/km5PIduHgl
— jitendra (@jitendrazavar) March 1, 2024
या प्रकारामुळे संग्रामपूर पंचायत समितीत काही काळ गोंध निर्माण झाला. कस्टडीरुमध्ये शिक्षकाला समजवून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगलीय असताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अनेक युजर्सकडून त्या शिक्षकावर अजून काहीच कारवाई न झाल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
हे ही वाचा