गणेश सोळंकी, बुलढाणा | 23 सप्टेंबर 2023 : गाव तेथे एसटी असे घोषवाक्य घेऊन एसटी बस गावागावात पोहचली. एसटीचे चालक चांगले प्रशिक्षित असतात. त्यांना वेगाची मर्यादा घालून दिलेली असते. यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हटला जातो. एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याची उद्धघोषणा बस स्थानकावरुन केली जाते. परंतु सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात वाहक चालक बनण्याची आपली हौस पूर्ण करत आहे. यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आता या व्हिडिओनंतर परिवहन महामंडळाचे अधिकारी काय भूमिका घेतात? हे पाहावे लागणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना शुक्रवारची आहे. खामगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात खामगाव आगाराच्या बस वाहकाला बस चालवण्याचा मोह आला. मग त्याला थांबणार तरी कोण? वाहक चालकाच्या सीटवर बसला आणि गाडीचे स्टेअरींग हातात घेतले. त्यामुळे या नवशिक्या वाहकाने चालकाच्या जागी बसून बसमधील जवळपास 40 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. त्याने निसरड्या रस्त्यावर बस चालवून आपली हौस भागवून घेतलीय.
बस वाहक बनला चालक pic.twitter.com/rG7QaYjCJl
— jitendra (@jitendrazavar) September 23, 2023
खामगाव आगाराच्या खामगाव, कारेगाव हिंगणा ही बसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साडेपाच वाजता खामगाव आगारातून निघाली. बसमध्ये 40 प्रवासी होते. बस पिंपरी गवळी बस थांब्यावर थांबली. त्यानंतर वेगळचा प्रकार घडला. एसटीत असलेल्या वाहकाने चालक बनण्याची इच्छी व्यक्त केली. मग चालकाने कोणताही विरोध न करता गाडीचे स्टेअरींग त्यांच्याकडे दिले. चालकाने ही बस वाहकाच्या हातात देऊन केबिनमध्येच उभा राहिला. पाऊसही सुरू असताना चालक आणि वाहकाने हे साहस केले. यामुळे बसमधील 40 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
St bus conductor become driver#Stbus #msrtc pic.twitter.com/pewpMQKQ1o
— jitendra (@jitendrazavar) September 23, 2023
बसमधील काही प्रवाशांना ही घटना समजली. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. बस चालकाला जाब विचारला. त्यावेळी आपण वाहकाला बस चालवणे शिकवत असल्याचे उत्तर त्याने दिले. प्रवाशांनी तिकीट काढण्यास कोण आहे? हा सुखाचा प्रवास आहे की दु:खाचा प्रवास आहे? असे प्रश्न प्रवासी विचारतांना व्हिडिओत दिसत आहे.