एसटी प्रवास महागला, किमान 5 रुपयांची भाडेवाढ, रात्रीचा प्रवास स्वस्त, नेमका काय बदल झाला ?

| Updated on: Oct 25, 2021 | 7:50 PM

25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार आहे. नव्या निर्णयानुसार तिकीट किमान 5 रूपयाने वाढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10रूपयांनी कमी करण्यात आले आहेत.

एसटी प्रवास महागला, किमान 5 रुपयांची भाडेवाढ, रात्रीचा प्रवास स्वस्त, नेमका काय बदल झाला ?
BUS
Follow us on

मुंबई : इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे.

25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ होणार

25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार आहे. नव्या निर्णयानुसार तिकीट किमान 5 रूपयाने वाढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10रूपयांनी कमी करण्यात आले आहेत.

तिकीट दरात वाढ नेमकी का केली ?

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

शिवशाही, शिवनेरी बसला पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून (25 व 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.

रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त

25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी 7 वाजता ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत 18 टक्के जास्त होते. उद्यापासून अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

इतर बातम्या :

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

Sameer Wankhede Photo: पहिलं लग्न ते धर्मांतर, खंडणी, अपहरण ते चौकशी… समीर वानखेडेंवरील आरोप आणि प्रत्यारोप!

समीर वानखेडेंनी धर्म बदलला?, मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं लग्नाचा फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर

(ST increased bus ticket fare due to increase in fuel price hike know what all about)