एसटी संप मागे घेण्यात आला आहे. सर्व संघटनांनी पुकारलेला संप अखेर आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘विचित्र आणि वाईट बुद्धीने बाप्पााच्या आगमनाआधी महाविकासआघाडीच्या सरकारने गणेश भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. त्यांनी आज मुख्यमत्र्यांसमोर माफी मागितली आहे. त्या लोकांनी बिनशर्त आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पगारात ६५०० रुपये वाढ केली आहे. सरकारने स्वताहून ही वाढ केली आहे. शरद पवारांच्या संघटनेच्या मागणी आधीच सरकारने स्वत:हून ६५०० रुपयांची वाढ केली आहे. सातवा वेतन आयोगाची मागणी जनसंघ संघटनेने लावून धरली होती. जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसे वाढवले आहे.’
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं ही प्रमुख मागणी होती. याशिवाय इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. यावर आज तोडगा काढण्यासाठी सह्यादी गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या १३ संघटनांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.
१ एप्रिल २०२० पासून सरसकट मूळ पगारात ६५०० रुपये इतकी वाढ देण्यात आली आहे. इतर मागण्यांबाबत ही सकारात्मक विचार असून त्यावरही तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिलं.
कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सव गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले असते. त्यामुळे तोडगा काढणं महत्त्वाचं होतं. आजच्या बैठकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. समितीनं २०२० पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी सरसकट वेतनावाढ करावी अशी मागणी केली होती. जी सरकारने मान्य केलीये.