मुंबईः एसटी कर्मचारी संपातून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर (Ajay Gujar) यांनी एसची संपातून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही हा संप सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार कर्मचार्यांनी केला आहे. या संपातून केवळ दोघे बाहेर पडल्याची प्रतिक्रिया आंदोलकांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी दिली. दरम्यान संपाबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक संकेत दिल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘ आज सकाळी अर्धा तास आम्ही मंत्री महोदय सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा केली. आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. एसटी हा राज्याचा अभिवाज्य घटक आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी एका कागदावर लिहून घेऊन अधोरेखित करून घेत, मी कायदेपंडितांशी चर्चा करून सांगतो असं त्यांनी सांगितलं. कामगारांच्या हिताकरता त्यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मंत्री महोदयसोबत आमचं हे प्रिव्हिलेज टॉक होतं. मंत्रीमहोदयांनी एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की, तुमची ही लढाई तुम्ही कामगारांच्या हिताकरता न्यायालयात लढा. कामगारांना न्याय मिळवून द्या. राज्यातील सर्व शिवसैनिक आणि सर्व पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आमच्या लढ्या सोबत आहेत.’
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘ अजय गुजर आणि त्यांचे फक्त दोन माणसं या दुखवट्यातून बाहेर पडलेली आहेत. त्यामुळे या दुखवट्यावरती कोणताच परिणाम झालेला नाही. जवळपास 92 हजार कर्मचारी पहिल्यांदा एकत्रित आलेले आहेत. अजून देखील ते या दुखवट्यावरती ठाम आहेत. जवळपास 54 एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव याकरता गमावलेला आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचारी दुखवट्यावर ठाम असून, आजसुद्धा राज्यभरातल्या एसटी संपूर्ण थांबलेल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ कोणीही माझ्यावर टीका केली तरी मला काही फरक नाही. मी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढत आहे. त्यामुळे ते कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि ते काल आमच्यापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही. एम के गांधी देखील वकील होते. त्यांनी देखील अनेक आंदोलने केलेली होती कर्मचार्यांच्या हक्क न्याय मागणीसाठी त्यांनी देखील अनेक कोर्टामध्ये संपकार्यांची कामगारांची भूमिका ठेवलेली होती त्यामुळे अल्पसंतुष्ट लोक अशा प्रकारची टीका करत असतात.
इतर बातम्या-