St worker strike : कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार जमा, तर संपकऱ्यांना पगार नाही

| Updated on: Dec 07, 2021 | 5:19 PM

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत.

St worker strike : कामावर हजर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार जमा, तर संपकऱ्यांना पगार नाही
NAIL PARAB AND ST
Follow us on

मुंबई : एक महिना उलटून गेला तरी तब्बल 72 हजार एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटीच्या मोठ्या संपानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, हे आधीच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जमा

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटी संपकरी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12% वरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे. तर जे कर्मचारी संपावर आहेत त्याचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत.

250 पैकी 123 डेपो मध्ये वाहतूक सुरू

राज्यात दुपारपर्यंत 250 पैकी 123 डेपोमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाडण्याची शक्यता आहे. तर संप चिघळल्याने आजही काही ठिकाणी एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्यााचं समोर आलं आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरू करताना मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याचंही पहायला मिळालं. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास 10 हजारांच्या आसपास गेली आहे, तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल 2 हजारांच्या वर गेली आहे.

Gold And Silver Prices Today: सोने आज पुन्हा महागले, नेमका भाव किती?

Omicron India : ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह! तर नियम मोडणाऱ्या दुसऱ्यावर गुन्हा दाखल

शानदार 2021 Volkswagen Tiguan भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स