मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने एका शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी प्रत्येकाला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात निवसी डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. संपूर्ण राज्यभर हा संप झाल्यामुळे आरोग्यसेवेवर ताण पाडण्याची शक्यता होती. त्यानंतर सरकारने मार्ड संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता म्हणून सरकारने वरील निर्णय जाहीर केला आहे. या नव्या निर्णयानुसार डॉक्टरांनी केलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येक डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
कोविड काळातील रुग्णांच्या उपचारामध्ये राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. म्हणून निवासी डॉक्टर्स यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी मार्ड संघटनेने राज्यसरकार कडे केलेली होती. या मागणीचा राज्य सरकारने सवेंदनशीलपणे विचार केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने संबंधित विभागातील अधिकारी व सेंट्रल मार्ड प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतलाी होती. या बैठकीत निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा असे आदेश दिले होते.
त्या नंतर दोन दिवसातच राज्यसरकारने हा निर्णय घेतला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यशासनाच्या या निर्णयामुळे आम्हाला रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे, अशी भावना महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
कोव्हिड भत्ता मिळाला पाहिजे
शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलच्या समस्या दूर व्हाव्या
पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफ करावी
इतर बातम्या :
ऊसाची FRP एकरकमीच मिळणार, पिषुय गोयल यांचं सदाभाऊ खोतांना आश्वासन
MPSC Exams | एमपीएससीकडून जाहिरातींचा धडाका, वेगवेगळ्या विभागात 48 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
VIDEO : Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा मुक्काम तुरुंगात !https://t.co/apAkdan6zs#AryanKhan #ShahRukhKhan #ArthurJail
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021
(state government giving rupees 1 lakh rupees to each resident doctor for their contribution during corona pandemic)