महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Jan 12, 2025 | 9:29 PM

सुरतहून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत गाडीच्या B 6 या डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटली आहे. त्यासंदर्भात काही प्रवाशांकडून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
दगडफेकीत रेल्वे खिडकीची काच फुटली.
Follow us on

प्रयागराजमध्ये सोमवारीपासून कुंभमेळ्यास सुरुवात होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराज येथे जात आहे. या दरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत खिडकीच्या काचाही फुटल्या. परंतु सुदैव चांगले यामध्ये कोणीच जखमी झाले नाही. हा प्रकार जळगाव रेल्वे स्थानकावर घडला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुरतवरुन प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे जात होती. ही रेल्वे जळगाव आली. जळगाव रेल्वे स्थानकावरुन ही गाडी सुटली. पुढे तीन किलोमीटर गेल्यावर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सुरतहून प्रयागराजकडे जाणारी ही ताप्तीगंगा एक्सप्रेस होती.

हे सुद्धा वाचा

अशी घडले घटना

सुरतहून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत गाडीच्या B 6 या डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटली आहे. त्यासंदर्भात काही प्रवाशांकडून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी सबंधित दगड मारणाऱ्या अज्ञात ढवाळखोरांचा शोध सुरू केला आहे. कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांनी रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

सुरत होऊन छपराकडे ही रेल्वेगाडी जात होती. जळगाव रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर काही अंतरावर एका टवाळा खोलाने गाडीवर दगड मारून फेकल्याची रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिले आहे. गाडीवर ही दगडफेक झाली नाही. एका टवाळखोराने खोडकरपणा म्हणून गाडीवर दगड मारून फेकण्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी बोलताना दिले आहे. या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून कुंभमेळ्यास सुरुवात होत आहे. पहिले स्नान सोमवारी होत आहे. बारा वर्षांतून एक वेळा होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने संत प्रयागराजमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.