मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईतून देशातील नवव्या आणि दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या एक्सप्रेसची सुरुवात केली. वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा चालवण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या तिर्थ क्षेत्रासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा शुभारंभ करण्यासाठी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्रासाठी सरकारने सर्वाधिक निधी दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत एक मागणी केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड स्थानकावर थांबा द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. मुंबई ते सोलापूर दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दौंड येथे थांबा देण्यात आलेला नाही. हे या परिसरातील मोठे जंक्शन असून येथे या परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या गाडीला या परिसरात थांबा देण्यात यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमधून पहिल्याच दिवशी 120 विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची संधी मिळाली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ही मोफत प्रवासाची संधी देण्यात आली होती. 16 डब्यांच्या या गाड्यांमध्ये 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. वंदे भारत 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे.मात्र रेल्वे बोर्डाने सध्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. सध्या देशात आठ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. ज्यामध्ये आजपासून आणखी दोन एक्सप्रेसची सुरुवात झाली आहे.
CSMT – Shirdi Vande Matram Express
सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी धावणार नाही.
सीएसएमटी स्थानकातून सकाळी 06.20 वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डीला रात्री 11.40 वाजता पोहोचेल.
साईनगर शिर्डी येथून 5.25 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. हे अंतर पाच तास 25 मिनिटांत पूर्ण करेल.
सीएसएमटी ते कसारा दरम्यान ताशी 105 किमी आणि इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान 110 किमी प्रतितास वेगाने धावेल.
सीएसएमटा – दादर – ठाणे – नाशिकरोड येथे थांबेल
CSTM – Solapur Vande Matram Express
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत ही गाडी बुधवारी धावणार नाही तर गुरुवारी सोलापूर-मुंबई मार्गावर धावणार नाही.
सोलापूरहून सकाळी ६.०५ वाजता सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
सीएसएमटी येथून दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहोचेल.
संपूर्ण प्रवास साडेसहा तासांत पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांचा दीड तास वाचणार आहे.
दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल.
ही ट्रेन लोणावळा ते सोलापूर दरम्यान 110 किमी, सीएसएमटी ते कर्जत दरम्यान 105 किमी आणि कर्जत ते लोणावळा दरम्यान 55 किमी प्रति तास वेगाने धावेल.