चंद्रपूर : राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवरून (ED) राजकारण पुन्हा पेटलं आहे. राज्यातल्या नेत्यांच्या चौकशीमागे फडणवीस (Devendra Fadnavis) असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तर संजय राऊत यांनीही चौकशी आणि केंद्रीय तपास यंत्रणेवरून भाजपवर तोफ डागलीय. माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाल्याची चौकशी केली. असा थेट आरोप राऊतांनी केलाय. तर त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. चौकशींच्या आरोपावरून मुनगंटीवरांनी (Sudhir Mungantivar) थेट मुख्यमंत्र्यांना खोचक टोले लगावले आहेत. चौकशीमुळे कुठलेही सरकार अस्थिर होत नाही असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना असाच त्रास दिला गेला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे हेदेखील चौकशीला पूर्ण शक्तीनिशी सामोरे जात आहेत, असेही त्यांनी बजावले.
बाळासाहेबांवर कारवाई करणाऱ्यांबरोबर सत्तेत
त्यांनी राज्यात महाविकास आघाडी झाली आहे, त्यावरूनही समाचार घेतला आहे. अगदी भुजबळांनी देखील मागील काळात मंत्री असताना शिवसेनाप्रमुखांवर कारवाई केली होती, आज मुख्यमंत्र्यांच्या पित्यावर कारवाई करणाऱ्या सोबत उद्धव ठाकरे सत्तेत आहेत, आसा टोला लगावात त्यांनी भुजबळ आणि शिवसेनेची जुनी जखल डिवचली आहे. त्यामुळे त्यावरही आता जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्याता आहे. तसेच स्वतःला वाघोबा म्हणता आणि चौकशीला का घाबरता? असा विचारला सवाल मुनगंटावर यांनी शिवसेनेला विचारला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत मुबईतला दादा शिवसेनेचा म्हणाले होते.
महाविकास आघाडीचे आरोप काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तपास यंत्रणा काम करत आहेत.ईडीचे लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर तिथे आम्ही माहिती बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्रं लिहिलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करण्याचा काही लोकांनी मला गळ घातली होती. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. पण मी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी मला माझी रेल्वे मंत्र्यासारखं तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी देण्यता आली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.