‘नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की….’, शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 07, 2024 | 5:17 PM

"शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत. शरद पवार यांनी वक्तव्य करताना शाहनिशा करायला हवी होती. त्यांनी आजपर्यंत पदाधिकाऱ्यांवर कधीच टीका केली नाही. माझ्याबद्दल असं का वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय", असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं.

नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की...., शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

पुणे | 7 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना मोठा इशारा दिलाय. या इशाऱ्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिलीय. “आपण कुणालाही धमकी दिलेली नाही. शरद पवार यांनी आपल्यावर खोट आरोप केले आहेत. त्यामुळे आपण स्वत: शरद पवार यांना भेटालया जाणार आहोत. आपण कुणाला धमकी त्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला दाखवून द्यावं. शरद पवारांनी माझ्यावर अशाप्रकारे टीका करणं हे आश्चर्यकारक आहे”, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.

“या मेळाव्याचे ज्यांनी आयोजन केलं होतं. त्यांनी काही माहिती शरद पवार यांना दिली की अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करायचा आहे. पण ही माहिती खोटी होती. 35 ते 40 कार्यकर्ते तिथे उपस्थितीत होते. शरद पवार यांना खोटी माहिती दिली गेली. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत. शरद पवार यांनी वक्तव्य करताना शाहनिशा करायला हवी होती. त्यांनी आजपर्यंत पदाधिकाऱ्यांवर कधीच टीका केली नाही. माझ्याबद्दल असं का वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय”, असं मत सुनील शेळके यांनी केलं.

‘नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की….’

“मी आता शरद पवार यांची भेट घेणार आहे. माझी काय चूक झाली हे मी शरद पवार यांची भेट घेऊन विचारणार आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची मी नक्की नोंद घेईन. एकतरी माणूस दाखवा की मी कोणाला धमकी दिली. तो माणूस समोर आणा. नाहीतर मी महाराष्ट्राला सांगणार की शरद पवारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अजित पवार यांना साथ देणं हे माझं वैयक्तिक मत होतं. शरद पवार यांनी माझ्यावर टीका करणं हे मला कधीच अपेक्षित नव्हतं”, अशी भूमिका सुनील शेळके यांनी मांडली.

शरद पवार सुनील शेळके यांच्याबद्दल काय म्हणाले?

“मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.