मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात आणि या आठवड्यातील दोन दिवस ठाकरे गटाने कोर्टात आपली बाजू मांडली. आजपासून शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो? ठाकरे गटाने गेली पाच दिवस केलेल्या युक्तिवादातील कोणते मुद्दे शिंदे गटाकडून खोडून काढली जातात आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून कोणते नवे मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नबाम रेबिया प्रकरणाचा आधार घेऊन शिंदे गट काही युक्तिवाद करणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह सर्वोच्च न्यायालयातील राज्यातील सत्तांसघर्षाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
पुणे :
उद्या कसबा पोटनिवडणुकीची होणार मतमोजणी
मतमोजणीची सगळी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे
14 टेबलवर होणार मतमोजणी
तर मतमोजणीच्या असणार 20 फेऱ्या
सुरुवातीला टपाली मतमोजणीला होणार सुरुवात
एका टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहाय्यक, 1 सुक्ष्म निरीक्षक असणार उपस्थित
सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
नवी दिल्ली : सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार,
आज शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.
नवी दिल्ली : राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापन करण्यासाठी बोलावलं होतं का ? असा सवाल सरन्यायाधीश यांनी म्हंटलं आहे.
विश्वासदर्शक ठराव होता त्यावेळी महाविकास आघाडीचे 13 लोकं नव्हते असा युक्तिवाद केला आहे
उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी फक्त 99 जणांचे सदस्य होते – कौल
अध्यक्षांनी पुरेसा वेळ दिला नाही, यामुळे न्यायालयात यावे लागले
राज्यपालांच्या कृतीचा विचार करताना दोन मुद्दे लक्षात घ्यावी एक म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले नाही
राज्यपालांनी शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवले होते का, असा प्रश्न सरन्यायाधीश यांनी विचारला.
सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर कौल यांनी उत्तर दिले. राज्य सरकार नेतृत्वाशिवाय काम करु शकत नाही
शिंदे गटाचे वकील कौल यांच्यांकडून रवी नाईक व जी.विश्वनाथन केसचा दाखला
आमदारांचे विरोधी पक्षातील नेत्यांसोबत फोटो होते
आमदारांना मतदानापासून रोखता येत नाही
अध्यक्षांनी बहुमत पाहून निर्णय घ्यावा
निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे
ते विधिमंडळ अध्यक्षांनी ठरवलं पाहिजे असं ठाकरे गटाला वाटतं
ठाकरे गटाकडून संभ्रमित केलं जातंय
बहुमताचा विचार करुन आम्हाला शिवसेना नाव व चिन्ह दिले – कौल
निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिली
आम्ही पक्ष फुटीचा कधी दावा केला नाही, त्यामुळे आम्हाला शिवसेना मिळाली
आमच्या म्हणण्यानुसार सुनिल प्रभू हे प्रतोद नाहीत- कौल
सुनिल प्रभू यांचे आदेश पाळणे बंधनकारक नाही
महाविकास आघाडीला आमचा विरोध होता- नीरज कौल
मध्य प्रदेशातील शिवराज चौहान खटल्याचा दिला दाखल
विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांना राज्य घटनेने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे
महाविकास आघाडीला शिवसेनाचा विरोध होता
२०१९ पर्यंत भाजप व शिवसेनेत युती होती
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन
तांत्रिक सेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम2025पासून लागू करा
वर्णनात्मक पद्धतीने न घेता बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे
लोकसेवा आयोगानं तांत्रिक सेवेच्या विद्यार्थ्यांनाही विचारात घ्यायला हवं
विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
नवी दिल्ली : एक महिन्याच्या आत निकाल येऊ शकतो,
घटनापिठाला वाटलं तर पुन्हा हे प्रकरण लार्जर बेंच कडे जाऊ शकत,
आज शिंदे गटाच्या वतीने दहाव्या अनुसूचीवर युक्तिवाद केला जाणार,
वकील सिद्धार्थ शिंदे यांची टीव्ही 9 मराठीला माहिती.
कसबा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी
कोरेगाव पार्कमधील अन्न धान्य गोदामात मतमोजणी होणार
सकाळी 10 वाजता मजमोजणीला सुरुवात होणार
मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
उद्या आमचा रिजोइंडर युक्तिवाद होईल, उद्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपतील
राज्यपालांच्या पत्रवर आक्षेप आहे, त्यावर SC ने प्रश्न उपस्थित केले
राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यावर तिथं संख्याबळ महत्वाचे होते, शिंदे गटाच्या 39 आमदारांनी सुनील प्रभू यांचा व्हीप झुगारला
संसद व्हीप – याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत. मर्यादा ओलांडणार नसल्याची त्यांच्या वकिलांनी ग्वाही दिली आहे
केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत नाही, मंत्रिमंडळ विस्तार हा प्रश्न त्यांचा आहे
आज महागाई वाढत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, त्यामुळे विस्तारापेक्षा सर्वसामान्यांना दिलासा देणे हे सरकारचं काम आहे
गेल्या पाच दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली
आजपासून शिंदे गटाचे वकील बाजू मांडण्याची शक्यता
शिंदे गटाचे वकील ठाकरे गटाचे मुद्दे खोडण्याची शक्यता
शिंदे गटाच्या वकिलांकडून आज नवा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता
थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला होणार सुरुवात