मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग दोन आठवडे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अनेक मुद्दे कोर्टासमोर मांडण्यात आले. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे. या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर शिंदे गटाचे वकील काय प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीची अपडेट जाणून घ्या.
सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली
बुधवारी 15 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार
बुधवारी कपिल सिब्बल आणि तुषार मेहता युक्तिवाद करणार
तुषार मेहता 1 तास युक्तिवाद करणार
उर्वरित वेळेत कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
अपात्रतेची नोटीस फक्त 16 जणांविरोधातच- जेठमलानी
काही आमदार परत येण्याच्या हेतूनं 16 जणांना नोटीस- जेठमलानी
39 आमदारांमध्ये त्यांना गट पाडायचे होते- जेठमलानी
मेरीटवर युक्तिवाद करण्याची कोर्टाची जेठमलानींना सूचना
या गोष्टी मांडू नका, मेरीटवर युक्तिवाद करा- कोर्ट
हरीश साळवे आणि तुमच्या युक्तिवादात विसंगती- कोर्ट
सत्ता संघर्षाबाबत महत्वाची बातमी
लंचब्रेकनंर सत्ता संघर्षावरील सुनावणीला सुरुवात
घटनापीठ कोर्ट रुममध्ये दाखल
सकाळपासून ही सुनावणी सुरु आहे
एकूण 2 दिवस ही सुनावणी चालणार आहे
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शन योजनेसाठी धडकले शेकडो शासकीय कर्मचारी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू
भजन म्हणत केली जात आहे जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
सगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला
राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं
बहुमत बळाच्या जोरावर झालं असं कसं म्हणता येईल
जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात
विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पद, 10 व्या शेड्यूल अंतर्गत येत नाही
अविश्वास असेल तर बहुमत चाचणी होते. त्यात गैर काय
बहुमत चाचणी बोलावून राज्यपालांनी काहीही चूक केलेलं नाही
हरीश साळवे यांचा युक्तिवाद संपला
नवी दिल्ली : मुद्दा पक्षफुटीचा नव्हे पक्षांतर्गत वादाचा आहे.
आमदारांनी विधिमंडळात बहुमताने निर्णय घेतले आहेत यात हस्तक्षेप करू नये.
उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही मविआतून बाहेर पडत असल्याचे पत्र काही आमदारांनी दिले म्हणून राज्यपालांनी चाचणीचे आदेश दिले.
पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे कोर्टाला नाही.
बहुमत चाचणी सभागृहातच केली जाते
अविश्वास निर्माणण झाल्यास बहुमत चाचणी घेणं गैर नाही
राजभवनात बहुमत चाचणी झाली नाही
बहुमत नसल्याने विधानसभा उपाध्यक्षांनी आपलं पद गमावलं
साळवे यांच्याकडून किहोटो, रेबिया, मणिपूर आणि बोम्मई प्रकरणाचा दाखला
हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरु केला
अध्यक्षांना घटनात्मक अधिकारी आहे
बहुमत चाचणी राजभवनात झाली नाही, सभागृहात झाली
बहुमत नसल्याने उपाध्यक्षांनी आपले पद गमावले
10 व्या शेड्युलचं उल्लंघन झाल्याने आमदार अपात्र व्हायलायच हवेत
सुप्रीम कोर्टाचा निकाल न्यायाच्या बाजूने लागावा एवढीच अपेक्षा आहे
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला
मात्र आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय, निकाल हा न्यायाच्या बाजूने लागायला हवाय
आम्ही अंधभक्त नाही की आधीच काय होईल सांगायला, अरविंद सावंत यांचा खोचक टोला
90 टक्के शक्यता आहे हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार
राहुल नार्वेकरांकडे पुन्हा हे प्रकरण जाईल- सरोदे
अपात्र आमदारांचं प्रकरण पुन्हा विधानसभेत जाणार ?
2 दिवसांत आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गट युक्तिवाद करणार
उद्या दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार
उद्याच सत्तासंघर्ष बाबतच्या निकालाची घोषणा होण्याची शक्यता
निकाल राखून ठेवला जाणार ?
घटनापीठातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल ?
आज हरीश साळवे ऑनलाइन युक्तिवाद करण्याची शक्यता
ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे
या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे
त्यावर शिंदे गटाचे वकील काय प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे