मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी काल दहाव्या अनुसूचीचा दाखला देत शिंदे गटाला कोणतंही कायदेशीर संरक्षण उरत नसल्याचं म्हटलं. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही पदावर राहू शकत नसल्याचा युक्तिवाद केला होता. सिब्बल यांच्या हा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील कसा खोडून काढतात हे पाहावं लागणार आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यावरही आज सुनावणी होणार आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार
एक आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार
निवडणूक आयोग व शिंदे गटाला नोटीस
ठाकरे गटाच्या आमदारांवर दोन आठवडे कारवाई करता येणार नाही
शिवसेना धनुष्यबाण आणि पक्ष चिन्हावर सुनावणी सुरु
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही- नीरज कौल
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद
घटनेचा १३६ चा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने येथे वापरु नये
नवी दिल्ली :
निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी अशी ठाकरे गटाची याचिका
सुनावणी सुरु
तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात
सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली
कपिल सिब्बल यांचा आज जबदरस्त युक्तिवाद
थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील याचिकेवर सुनावणी होणार
तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद होणार
राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षात प्रतोद हा दुवा
व्हीप जारी करण्याआधी धोरणाला विरोध कलेला जाऊ शकतो
आसाममध्ये बसून मुख्य प्रतोद ठरवू शकत नाही
अधिवेशनावेळी वारंवार बैठका घेऊन धोरणं ठरवली जातात
राजकीय पक्ष म्हणजे आई, विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोदांना आव्हान देऊ शकत नाही
प्रतोद हे राजकीय पक्षांची भूमिका विधिमंडळात मांडतो
३८ जण पक्षाची धोरणे ठरवू शकत नाही
एखाद्या धोरणाला विरोध हा व्हिप जारी करण्याआधी करतो येतो
पक्षाचे आदेश आमदाराला पाळवे लागतात
राजकीय पक्षाने घेतलेले निर्णय विधिमंडळ पक्षाला बंधनकारक
व्हीप हा फक्त राजकीय पक्ष जारी करतो, विधिमंडळ पक्ष नाही
राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षात काय असतो फरक हे सिब्बल यांनी युक्तीवादात सांगितले
फुटून गेलेले पक्ष राजकीय नव्हे तर विधिमंडळ पक्ष- सिब्बल
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली होती. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत होते
31 ऑक्टोबर 2019 ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची उद्धव ठाकरे यांनीच नियुक्ती केली.
व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो, 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते. मुख्यमंत्रीही नव्हते. ते केवळ शिवसेनेचे अध्यक्ष होते.
असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
सुनील प्रभू यांची निवड कशी झाली होती हे वकील सिब्बल सांगत आहेत
एकनाथ शिंदे यांची नेतेपदी उद्धव ठाकरे यांनीच केली होती
आमदारांनी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता
सरन्यायाधीश- याचा अर्थ त्यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती केली का
कपिल सिब्बल- काही निवडून आले, काहींची नियुक्ती केली
सरन्यायाधीश – पण ते काय म्हणून आणि कुठे निवडून आले
कपिल सिब्बल – राष्ट्रीय कार्यकारिणीत
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे वकील दुपारपर्यन्त युक्तिवाद करणार,
सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू,
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू.
दुपारी 3.30 वाजता आयोगाविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी
ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्याने ठाकरे गटा सर्वोच्च न्यायालयात
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
जेव्हा घटना घडली तेव्हापासून दहावी अनुसूची लागू होते
कायद्यातील तरतुदी लावूनच प्रकरण निकाली काढावे
दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाकडे होणार सुनावणी
अनेक कायदे तज्ज्ञांनी विश्लेषण केले, त्याविपरीत निर्णय दिला गेला, अनिल देसाई यांचा दावा
सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस
काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला
आज शिंदे गटाचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे