मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. सकाळी 10.30 वाजता सुनावणीला होणार सुरुवात होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज ही सुनावणी होत आहे. आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात सर्व बाजूंचा युक्तीवाद पुर्ण
न्यायालयाने निकाल राखून ठेवला
प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? निकाल राखून ठेवला
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणारी सुनावणी पुर्ण
नबाम रेबिया केसचा आणि महाराष्ट्राच्या घटनेचा संबंध नाही- ठाकरे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद
शिंदे गटाच्या याचिकेत तथ्यं लपवण्यात आली – सिंघवी
किहोटो केस सांगते अध्यक्षांच्या अधीकारात कोर्टाचा हस्तक्षेप नको
अपात्रेची कारवाई झाली नसल्याने ठाकरे सरकार कोसळले
लोकसभा आणि विधानसभेच्या नियम वेगळा
बहुमत नसले तरी अध्यक्षांना आमदारांवर कारवाई करता येते
नबाम रेबिया केसवर पुन्हा झाली चर्चा
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद,
गुवाहाटीमध्ये बसून सरकारसंदर्भात नोटिस पाठविली,
कपिल सिब्बल यांनी लोकसभेतला अनुभव कोर्टाला सांगितला,
लोकांना विकत घेऊन सरकार पाडण्यात आले – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.
सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांची चर्चा सुरू
सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं
शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे जोरदार युक्तिवाद
जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही
दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये
तुम्ही 34 असले तरी विलिनीकरण हाच पर्याय
दहाव्या सूचीत बहुमताला महत्त्व असा काही नियम नाही
आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो
राजस्थानमधील केसचाही दिला दाखला
नवी दिल्ली : मनिंदर सिंह हे शिंदे गटाचे वकील,
सुप्रीम कोर्टात मनिंदर सिंह युक्तिवाद केला जात आहे,
विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर मनिंदर सिंह बोलत आहे.
जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु
आमदारांच्या जीवाला धोका होता, असा दावा महेश जेठमलानी यांनी केला
शिवराजसिंह चौहान यांच्या केसचा दाखला देण्यात आला
मध्य प्रदेशाच्या केसचे वाचन सुरु
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट
-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची चिंचवड पोटनिवडुकीसाठी बैठकांचे सत्र
-रात्री ९ पर्यंत मॅरेथॉन बैठका सोसायटी प्रतिनिधी युवा कार्यकर्ते आणि चिंचवड मधल्या विविध भागातील नागरिकांबरोबर दिवसभर करणार
सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे
नबाम रिबिया हाच महाराष्ट्राच्या केसला लागू होतो का? याबाबत आमच्या वकिलांनी बाजू मांडली
महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशमध्ये फरक आहे हे आम्ही सांगितले
सरन्यायाधीशांनी पण याबाबत काही विसंगती व्यक्त केली.
घटनाक्रम हा यात बघितलाच पाहिजे
त्यानुसारच कायद्याचा काय परिणाम होतो हे महत्त्वाचे
राजीनामा 29/30 तारखेला झाला, पण त्याआधीच अपात्रतेची कारवाई सुरु झाली होती
16 आमदारांची अपात्रतेची कारवाईचा क्रम पहिला
29 तारखेला ज्या घटना घडल्या त्याचा अर्थ 21 तारखेच्या आधी कश्या लावू शकतो?
फ्री फ्लो आँफ ह्यूमन कॅपिटल याचा उल्लेख सरन्यायाधीशांनी केला
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार बाधित करून अशा गोष्टी होऊ देणं लोकशाहीला घातक
7 न्यायमूर्तीकडे जरी केस गेली तरी लवकरात लवकर निकाल लागेल, कारण सरन्यायाधीशांनी पण या गोष्टी लोकशाहीला घातक म्हटले आहे
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे
सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे
यावेळी शिंदे गटाचे वकील आजही शिंदे गटाची बाजू मांडणार
सलग तिसऱ्या दिवशी आज होणार सुनावणी
आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार
10.30 वाजता सुनावणीला होणार सुरुवात
सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता