एअर इंडियाच्या विमानास उशीर, खासदार सुप्रीय सुळे संतप्त, उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी थेट…

| Updated on: Mar 22, 2025 | 11:53 AM

एअर इंडियाच्या विमानांना सतत उशीर होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवाशासाठी प्रीमियम शुल्क देऊन तिकीट घेतो. त्यानंतरही विमानांचे उड्डान वेळेवर होत नाही. व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, मुलांना या सर्व कुप्रबंधनाचा फटका बसतो.

एअर इंडियाच्या विमानास उशीर, खासदार सुप्रीय सुळे संतप्त, उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी थेट...
Supriya Sule
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

विमान प्रवास करताना विमानांना उशीर होण्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यानंतर यासंदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाही. विमान प्रवास करताना विमानांना उशीर झाल्यास संबंधित विमान कंपनी काहीच दखल घेत नाही. आता सर्वसामान्यांच्या भावनांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे. एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना त्यांनाही विमानास उशीर होण्याचा अनुभव आला. त्यामुळे त्या संतप्त झाला. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर ट्विट करत विमान कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिले, मी एअर इंडियाची फ्लाइट AI0508 ने प्रवास करत आहे. या विमानास 1 तास 19 मिनिटे उशीर झाला आहे. विमानास उशीर होणे ही सवयच बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असतो. हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे. त्यांना आग्रह आहे की एअर इंडियासारख्या विमानांना वारंवार होणाऱ्या उशिराबद्दल उत्तरदायित्व निश्चित करावे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात यावी.

सुप्रिया सुळे यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, एअर इंडियाच्या विमानांना सतत उशीर होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवाशासाठी प्रीमियम शुल्क देऊन तिकीट घेतो. त्यानंतरही विमानांचे उड्डान वेळेवर होत नाही. व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, मुलांना या सर्व कुप्रबंधनाचा फटका बसतो. यामुळे नागरिक उड्डयन मंत्रालयाने कारवाई करावी, तसेच एअर इंडियाचे उत्तरदायित्व निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एअर इंडियाकडून स्पष्टीकरण

एअर इंडियाकडून सुप्रिया सुळे यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, विमान उड्डानास उशीर होणे हे खूप निराशाजनक आहे. परंतु कधी कधी आमच्या नियंत्रणापलीकडे ऑपरेशनल संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे उड्डानेचे शेड्यूल प्रभावित होते. मुंबई जाणाऱ्या तुमच्या विमानास याच कारणामुळे उशीर झाला.