Walmik karad and MLA Suresh Dhas: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप रोज सुरु आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नावही चर्चेत आले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी असा एक उल्लेख केला होता. त्यानंतर ही मुन्नी कोण? याबाबत चर्चा सुरु झाली होती. ही मुन्नी महिला नाही तर पुरुष आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे. बुधवारी पुन्हा त्यांनी हा उल्लेख केला.
आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराड याच्या मातोश्रीच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. त्या माऊलीच्या विरोधात आपणास काहीच बोलायचे नाही. एखाद्या भगिनींच्या बाबतीत काही बोललो तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो. त्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा.
आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी आरोपीसाठी पुकारण्यात आलेल्या परळी बंदवर टीका केली. ते म्हणाले, परळीचा नवीन पॅटर्न आता महाराष्ट्राने घ्यावा का?. कुठेही आरोपीला ताब्यात घेतले की शहर बंद करायचे असा हा पॅटर्न आहे. आरोपींसाठी शहरे बंद करण्याचा नवीन पॅटर्न परळीमधून सुरु झाला आहे. व्यापारी शहर बंद करुन स्वत:चे नुकसान करत आहे. त्यांच्याकडून निर्माण झालेल्या या दबावाला कोणी विचारत नाही, असे ते म्हणाले.
परळीत जातीवाद सुरु झाला आहे का? त्यावर बोलताना आमदार धस म्हणाले, हा जातीवाद नाही. वाल्मिक कराड यांना मानणारे चार ते पाच टक्के लोक आहे. त्यांच्याकडून निर्माण केलेला हा गुंडावाद आहे. त्याला जातीवाद हा शब्द वापरु नका. या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आले आहे, त्यांनी काय काय कारवाई केली ते पाहू.
संतोष देशमुख प्रकरणात अजूनही खूप कारवाई होणे बाकी आहे, असे आमदार धस म्हणला. ते म्हणाले, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अजून झालेली नाही. आका सापडला आहे पण आकाच्या पुढे आणखी कोण सापडतो का? हा खटला व्यवस्थित चालला आहे का? हे सर्व अजून पाहावे लागणार आहे.
हे ही वाचा…
वाल्मिक कराड याने लाखो रुपयांचा कर थकवला, आता फ्लॅटचा लिलाव होणार