सोलापूर : व्हायरल व्हिडीओबद्दल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली. त्यानंतर त्यांनी भाजपला दोन सवाल केले. सांगोल्यामधल्या सभेमध्ये अंधारे यांनी दोन कात्रणं दाखविली. वारकऱ्यांच्या नावानं आपल्याला टार्गेट केल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. व्हायरल व्हिडीओबद्दल माफी मागितल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा संतांबद्दल भाष्य केलं. ज्या ज्या लोकांनी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला ते सर्व भाजप आणि मनसेच्या सोशल मिडियाच्या पेजवर व्हायरल झाले. कारण मनसे आणि भाजपचं पुण्य मी सर्वात जास्त वाटून घेतलं होतं.
ज्यांनी ज्यांनी म्हटलं ते खरं तर भागवत संप्रदायाशी संबंधित लोकं नव्हते. वारकरी कधीचं अभद्र भाषा वापरू शकत नाही. वारकरी कधी कुणाबद्दल वाईट बोलू शकत नाही. माऊली-माऊली असं म्हणणारा वारकरी एखाद्या माऊलीची अंत्ययात्रा कसा काढू शकेल, असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.
भागवत संप्रदायाच्या भावना दुखावल्या तर लाखवेळा माफी मागेन. भागवत संप्रदायाच्या नावाखाली मोहन भागवत संप्रदाय घुसखोरी करणार असेल, तर मात्र झुकणार नाही, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला.
यावर शंभूराज देसाई म्हणाले, सोप्या भाषेत सांगायचं काम वारकरी करतात. पण, केवळ स्वतःवर झालेली टीका सहन न झाल्यामुळं अशाप्रकारे कोणाचेतरी संबंध तोडायचा केवीलवाणा प्रयत्न सुषमा अंधारे करत आहेत. खरं तर वारकरी संप्रदाय हा सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर प्रचंड नाराज आहे.