पुणे : शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे ( Eknath Shinde ) गटाला दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा संघर्ष सुरू होता. अशातच निवडणूक आयोगात ( Election Commission ) सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Suhsma Andhare )यांनी शिंदे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा कालचा निकाल निश्चितपणे सबंध महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होतं अशी नाराजी व्यक्त केली आहे.
तथ्यांच्या आधारावर जेव्हा कागदपत्र सादर करायला सांगितली होती तेव्हा जर शिंदे गटाची एकूण कागदपत्र 4 लाख सादर झाली असतील. तर त्याच वेळेला आम्ही 22 लाख डॉक्युमेंट सादर केले होते.
महत्त्वाचं असं आहे की जे लोक गेले आहेत, ते लोक मूळ शिवसेनेतून निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कि मिरीटवर निकाल लागला पाहिजे, तर मुळात शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी मेरिट कधीच सिद्ध केलं असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सत्तांतराच्या नंतर सुद्धा अंधेरी पूर्व ची पोटनिवडणूक झाली त्यात शिंदे गटाचा उमेदवार नव्हता, पाच विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक झाली त्यातही शिंदे गटाचा उमेदवार नव्हता.
आता कसबा आणि चिंचवडमध्ये एकही उमेदवार नाहीये. त्यामुळे तुम्हाला मेरीट सिद्ध करायची संधी मिळालेली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की आम्ही मेरीट सिद्ध करतो मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेत नाही? असेही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक आहेत हे प्रशासक काडून निवडणुकीला सामोरे का जात नाहीत ? तरीसुईडी आणि सीबीआय सारख्या स्वायत्त यंत्रणेला कामाला लावलं होतं असतं आता निवडणूक आयोगालाही कामाला लावलं आहे.
जर अशा पद्धतीने भाजपा निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखी वापर होत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे की आपण असे वागावे का? अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे कधीकधी असे आरशात उभे राहून बोलतात असं मला वाटतं कारण ज्या एकनाथ शिंदेंना एवढे सगळे अधिकार शिवसेनेकडे असताना होते, म्हणजे मंत्री असताना होते, ते एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना विचारता एकही निर्णय घेऊ शकत नाहीत.
अजून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा साधा करता आलेला नाही. त्यांच्या मनाप्रमाणे जर ते खरंच महाराष्ट्र आणि शिवसेना आणि धनुष्यबाण याची गौरव गरिमा आणि अस्मिता शाबू ठेवण्यासाठी काम करत असतील तर राज्यपाल कोषारीच्या राजीनामाच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती.
पण ते त्यावर चकार शब्द बोलले नाही, कर्नाटकला गाव जोडतानाचा जेव्हा निर्णय चालू होता तेव्हा सुद्धा जोपर्यंत केंद्र सरकारचा सिग्नल मिळत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे चकार शब्द बोलले नाही.
उलट बोम्मईच्या आक्रमकपणाला नंतरच्या काळात देवेंद्र काहीसे सामोरे आले परंतु एकनाथ शिंदेंनी हिम्मत दाखवली नाही याचाच अर्थ एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण हा देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपाकडे गहाण ठेवलेला आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतरचं जे सेलिब्रेशन होतं ते दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटल्यासारखं सेलिब्रेशन होतं अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.