संतोष जाधव, उस्मानाबादः एसटी महामंडळाची (State transport) वर्दी घालून सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल करणं एका महिला कंडक्टरला महागात पडलंय. अशा प्रकारामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका लेडी कंडक्टरवर (Lady Conductor) ठेवण्यात आलाय. मंगल सागर गिरी असं या कंडक्टरचं नाव आहे. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. मंगल गिरी या महिला वाहक आणि वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार या दोघांना महामंडळानं निलंबित केलंय.
मंगल गिरी यांनी विविध गाण्यांवर व्हिडिओ तयार केले. ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. यावर आतापर्यंत आक्षेप नव्हता.
मात्र एसटी महामंडळाची वर्दी घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर त्यांनी एक व्हिडिओ केला. तो तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत मंडलाने ही कारवाई केली आहे.
तसेच हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलंय.
मात्र माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असून काही संघटनांच्या वादातून ही कारवाई झाल्याचा आरोप मंगल गिरी यांनी केलाय. माझ्यासारखे अनेक जण एसटी मंडळात आहेत. ते सोशल मीडियावर रिल्स करतात. पण त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल मंगल गिरी यांनी केलाय.
दरम्यान, मंगल गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतरही सोशल मीडियावरून तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगल गिरी यांच्यावरील कारवाईचा चाहत्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय.
https://t.co/FwyiNSJUFt@mieknathshinde साहेब ह्या महिला बहिणीने काय चूक केली म्हणून निलंबीत केले,@ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra @uddhavthackeray @RajThackeray
— Raju Thorat (@RajuThorat7) October 2, 2022