रत्नागिरी: 86 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

| Updated on: Nov 20, 2021 | 9:11 AM

रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण एसटी 86 कर्मचऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सध्या जिल्हामध्ये एकूण 249 कर्मचारी रोजंदारीवर काम करतात. संप मागे न घेतल्याने त्याती 86 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

रत्नागिरी: 86 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम
Follow us on

रत्नागिरी : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस वाहतूक ठप्प असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने आजापर्यंत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 86 कर्मचऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  24 तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र तरी देखील कर्मचारी कामावर हाजर न झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या 86 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

249  कर्मचारी रोजंदारीवर 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 4 हजार 339 इतकी आहे. त्यापैकी 249  कर्मचारी राज्य परिवहन महामंडळात रोजंदारीवर काम करतात. इशारा देऊन देखील कर्तव्यावर हजर न झाल्याने यातील 86 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर देखील निलंबनाची टांगती तलावर आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका लावला आहे. मात्र तरी देखील जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रूजू  होणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

आतापर्यंत राज्यात एकूण 2776 एसटी कर्मचारी निलंबित 

आज पुन्हा एकदा रोजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातील एकूण 238 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी 297 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत राज्यातील एकूण 2776 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावर रूजू न झाल्यास यापुढेही निलंबन सुरूच राहणार असल्याचा इशारा  सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?

राज्य परिवहन महामंडळाचे प्रशासकीय सेवेत विलनिकरण करावे. एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये करून, त्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा. महागाई भत्ता, घरभाडे आणि वेतनात वाढ करावी, अशा  विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी संप पुकारला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या 

Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!

महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

… तर राजीवजी आज खूप आनंदी असते; प्रज्ञा यांनी शेअर केला राजीव सातव यांचा संसदेतील व्हिडीओ