“राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला”; अर्थसंकल्पावरून शेतकऱ्यांची विदारकता या नेत्यानं सांगितली

| Updated on: Mar 09, 2023 | 6:45 PM

धान उत्पादन शेतकऱ्यांबाबतही शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असला तरी अतिरिक्त मालाच्या साठवणूक आणि प्रक्रियाबाबत मात्र कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही असंही त्यानी यावेळी सांगितले.

राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला; अर्थसंकल्पावरून शेतकऱ्यांची विदारकता या नेत्यानं सांगितली
Follow us on

कोल्हापूर : राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्यानंतर त्यावर आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांकडून सकारात्मक चर्चा करण्यात येत असली तरी विरोधी गटाकडून मात्र अर्थसंकल्पावर जोरदार टीका होऊ लागली आहे तर दुसरीकडे स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना ते म्हणाले की, राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला आहे.

 

ज्या प्रमाण हा चाट मसाला तेवढ्यापुरते चविष्ट वाटतं पण हाताला काही लागत नाही त्याच प्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पाचेही असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प म्हणजे चाट मसला असल्याचा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

 

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर सकारात्मकतेने बोलताना सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकारने 6 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे पण केवळ रासायनिक खतांचा विचार केला तर त्यामध्ये किती तरी पटीने झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली होती त्यांच्याबाबत घेतलेला निर्णयही स्वागतार्ह असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

तर धान उत्पादन शेतकऱ्यांबाबतही शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असला तरी अतिरिक्त मालाच्या साठवणूक आणि प्रक्रियाबाबत मात्र कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही असंही त्यानी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यानी राज्याचा अर्थसंकल्प मांडला असला तरी त्यामधून बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांबाबत जसा खोलवर विचार केला पाहिजे होता त्याप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात खोली कमी आणि उथळपणा जास्त असल्याचे सांगितले.