लातूरच्या स्वप्नालीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सलग 4 तासांत गायली 92 गाणी, लता मंगेशकर यांना अनोखा नजराणा

| Updated on: Sep 30, 2021 | 9:15 PM

भारतरत्न तसेच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरची गायिका स्वप्नाली गायकवाडने (Swapnali Gaikwad) अनोखा विश्वविक्रम केला आहे. स्वप्नालीने लतादीदींच्या 92व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजवर गायलेली 92 गाणी तब्बल 4 तासात सलग गायली आहेत.

लातूरच्या स्वप्नालीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सलग 4 तासांत गायली 92 गाणी, लता मंगेशकर यांना अनोखा नजराणा
SWAPNALI GAIKWAD
Follow us on

लातूर : भारतरत्न तसेच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरची गायिका स्वप्नाली गायकवाडने (Swapnali Gaikwad) अनोखा विश्वविक्रम केला आहे. स्वप्नालीने लतादीदींच्या 92व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजवर गायलेली 92 गाणी तब्बल 4 तासात सलग गायली आहेत. 28 सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांचा 92 वा वाढदिवस झाला. तब्बल चार तास गाऊन स्वप्नालीने हा विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या 92 गाण्यांमध्ये लग जा गले, होठों पे ऐसी बात, जाने क्या बात है या आणि अशा अनेक अजरामर गीतांचा समावेश आहे.

वयाच्या चार वर्षांपासून गाते संगीत

या विक्रमासाठी स्वप्नाली गेल्या 3 महिन्यांपासून अथक सराव करत होती. स्वप्नाली गायकवाड ही मूळची लातूरची असून ती 4 वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ती पं. उपेंद्र भट्ट (पं. भिमसेन जोशींचे परम शिष्य) यांची शिष्य आहे. याचसोबत तिने पुण्याच्या एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीमधून संगीताचे शिक्षण घेतले आहे. ती कायमच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कलेने प्रभावित होती. तिने आदिनाथ मंगेशकर (लता मंगेशकर यांचे भाचे) यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले आहेत. स्वप्नालीने दिलेली विश्वविक्रमाची ही भेट आदिनाथ मंगेशकरांसाठी आश्चर्याचा एक सुखद धक्काच होती. त्यांनी स्वप्नालीचे खूप कौतुकही केले.

जगभरातील विद्यार्थ्यांना देते शास्त्रिय संगिताचे देते धडे    

मराठवाड्याची स्वप्नाली ऑनलाईन पद्धतीने जगभरातील अनेकविध विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रिय संगीत शिकवत आहे. स्वप्नालीच्या मते हा विश्वविक्रम तिच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकला नसता. “माझ्या विद्यार्थ्यांनी गाण्यांची निवड करणे, म्युझिकल व्हिडिओसाठी गाण्यांची अरेंजमेंट करणे या सगळ्यासाठी खूप मदत केली,” असे स्वप्नाली आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाली.

स्वप्नालीवर अनेकांकडून कौतुकाची थाप

स्वप्नाली गायकवाडच्या या अथक प्रयत्नांना, तिला सहाय्य करणाऱ्या सगळ्यांच्या प्रयत्नांना या विश्वविक्रमासोबत यश आलं आहे. आपल्या आदर्शस्थानी असलेल्या गानसम्राज्ञीला स्वप्नालीने दिलेल्या या विलक्षण नजराण्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे. स्वप्नालीला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळाली.

इतर बातम्या

Manyavar Ad Controversy | आलिया भट्टची ‘कन्यामान’ जाहिरात वादात, अभिनेत्री विरोधात दाखल झाली तक्रार!

Sai Lokur : हनिमुनिंग इन मालदीव, सई लोकूर आणि तिर्थदीप रॉयचे व्हेकेशन फोटो

Radheshyam : ‘राधेश्याम’ येणार आपल्या ठरलेल्या तारखेलाच; मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित!

(swapnali gaikwad singer set world record sung 92 song continuously on occasion of lata mangeshkar birthday)