Video : 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणून विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी! पालकांनी शिक्षकाचा चोपलं, चित्रा वाघ संतापल्या

| Updated on: Jul 15, 2021 | 7:02 AM

12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

Video : 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणून विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी! पालकांनी शिक्षकाचा चोपलं, चित्रा वाघ संतापल्या
पुण्यात विद्यार्थीनीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या शिक्षकाला मारहाण
Follow us on

पुणे : 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच 12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला काळं फासून, त्याला चांगलाच चोप दिला आहे. (Parents beat up a teacher who uses obscene language with a student)

मुलीने केलेल्या गंभीर आरोपानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तसंच त्याच्या तोंडाला काळंही फासलं. त्यानंतर त्या शिक्षकाला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शैक्षणिक वारसा लाभलेल्या आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

चित्रा वाघही संतापल्या

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पुण्यातील या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. तसंच राज्यात अशा विकृती वाढत असल्याचं सांगत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ’11वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला 12वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली. असल्या घटनांच सत्र राज्यात सुरू आहे. जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नर्सचा छळ

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ केळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “डॉ. विश्वनाथ केळकर यांनी पीडित मुलीला आधी ठाणे महापालिका क्षेत्रात आरोग्य विभागात स्टाफ नर्समधून बढती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचा छळ केला. तिला कामावरून काढून टाकले. केळकर यांनी मुलीसोबत अश्लील भाषेत बातचित केली. मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मिळालेला नाही”, असं चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

‘पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही’

“पीडित मुलगी न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी तिची दिशाभूल करण्याचे काम केले. दुसरीकडे जी विशाखा कमिटी नेमली आहे ती कमिटीदेखील डॉ विश्वनाथ केळकर यांनी नेमली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. जोपर्यंत डॉ. केळकर यांना कामावरून काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत”, असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला.

संबंधित बातम्या :

हेमांगी कवी पोळ्या लाटत होती, ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, चित्रा वाघ संतापल्या

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

Parents beat up a teacher who uses obscene language with a student