मुंबई : Weather Alert : राज्यात थंडीचा कडका पुन्हा आला आहे. सर्वात हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानही घसरले आहे. उत्तर भारत व काश्मिरामध्ये सुरु असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरु आहे. निफाडमध्ये तापमान ९.५ अंशावर आले आहे.
मुंबईत यंदाच्या थंडीच्या हंगामातील सर्वात नीचांक १५ जानेवारी रोजी नोंदवण्यात आला होता. त्या दिवशी किमान तापमान म्हणजे १३.८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा पारा घसरला आहे. मुंबईतील तापमान १४ अंशावर आल्यामुळे थंडी जाणवत आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच हंगामातील नव्या नीचांकीच्या तापमानाची नोंद होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Mumbai and around temperatures right now at 11.30 pm 24 Jan.
Just 20 Deg C and Scz just below 20 Deg
Day time Tmax remained around 25-26Deg C and so its really very cool weather felt by Mumbaikars.
Morning it could be more down ~15 around possible.
Take care pic.twitter.com/2eipQhuZF8— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 24, 2023
उत्तर भारतातील काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच राजस्थानात चांगली थंडी आहे. तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरले आहे. त्याचा परिणाम रेल्वे व विमानसेवेवर होत आहे. IMD ने देशभरात पुढील तीन दिवस तापमानात घसरण कायम राहणार असल्याचं म्हटलंय. मध्य प्रदेशात तापमान दोन ते तीन डिग्री घसरणार आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगढमध्ये 8 शीतलहर कायम असणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तरी राजस्थान, बिहार, सिक्किम, त्रिपुरामध्ये आणखी तीन दिवस धुके कायम असणार आहे.