गेल्या तीन, चार दिवसांपासून मार्च महिन्यात उन्हाचा चांगला कडाका जाणवू लागला आहे. आता होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आताच तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. यंदा देशात मार्च आणि एप्रिल महिना सर्वात जास्त उष्णतेचा असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तापमान वाढीबरोबर राज्यात हलक्या पावसाची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.
राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. वर्धा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव शहरात होते. मालेगावात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त होते. ब्रम्हपूरी, वर्धा, नागपूर, जळगाव शहरातील तापमान ३९ अंशावर पोहचले होते.
विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा ४० शी पार गेला आहे. २८ मार्चनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान कोरडे राहील. २८ नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे.
साउथ इंटेरियर कर्नाटक ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरातवरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रतेसोबत गरम हवा घेऊन येत आहे. अजून एक पश्चिमी विक्षोभ २९ मार्चपर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८, २९ आणि ३० मार्च दरम्यान आद्रततेत वाढ होण्याची शक्यता आहे.