राज्यात एकीकडे कोरोनाचे नियम अधिकाधिक कठोर करण्याचा इशारा सरकार आणि प्रशासनाकडून दिला जातो आहे. मात्र राज्यातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी कमी होत नसल्यामुळे रुग्णावाढ पुन्हा डोक वर काढू लागली आहे. सक्रिय रुग्णसंख्येसोबतच नव्या रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जमावबंदी आणि निर्बंध, नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याचं पालन होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी महडमधील वरदविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती. मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात दाखल झाले असल्यानं मोठीच्या मोठी रांग यावेळी लागल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले होते.
मुंबईचा दादर परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा गर्दी आणि नेहमीसारखीच गजबज सुरु झाली. मात्र आता मुंबईत रुग्णवाढीची चिंता सतावत असताना प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना पाहायला मिळालंय. मास्क घालण्याचीही शुद्ध लोकांना राहिलेली नसल्याचं चित्र पाहायला मिळालंय. दादरमधील वाढती गर्दी प्रशासनासमोरची आव्हानं वाढवणारी असल्याचं बोललं जातंय. वेळीच या गर्दीला रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी मुंबईथ मालवणी जत्रा होतील की नाही, अशी शंका घेतली जात होती. मात्र कोरोनाचं भय आता मुंबईकरांना जराही उरलेलं नाही. मुंबईत सर्रास मालवणी जत्रांचं आयोजन केलं जात आहे. या मालवणी जत्रांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजत असून संसर्ग आणखी वेगानं पसरले अशी भीतीही व्यक्त केली जाते आहे.
प्रशासनाकडून आवाहन करुनही मुंबईकर गर्दी करत असल्याचं राणीच्या बागेत दिसलं आहे. रविवार असल्यामुळे राणीबागेत झालेली गर्दी धडकी भरवणारी आहे. लोकांकडून सर्रास नियम पायदळी तुडवले जात असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
नवनवर्षाचं स्वागत माऊलींच्या दर्शनानं घ्यावं, यासाठी पंढरपुरातही असंख्य भाविक दाखल झाले. भाविकांच्या गर्दीनं गजबजलेलं पंढरपूर, प्रशासनाची चिंता वाढवण्याची शक्यता आहे. गर्दीला नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे. या वाढत्या गर्दीमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचं आव्हान उभं ठाकलंय. अशातच वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे.
नाशिकच्या मुख्य बाजारपेठेतही नागरीकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. वाढत्या गर्दीला आता रोखायचं कसं, असं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय.
अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
गुंतवणुकीची योग्य वेळ: एफडीवर सर्वाधिक व्याज, ‘5’ बँकांची आकर्षक ऑफर
Fish rain | इकडे मार्गशीर्ष संपला, तिकडे माशांचा पाऊस पडला? कसा? समजून घ्या!