धारावीच्या मोर्च्यातून ठाकरे यांनी मारले एका दगडात तीन पक्षी, अदानी, फडणवीस आणि शिंदे टार्गेट

| Updated on: Dec 16, 2023 | 11:55 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : मुंबईतल्या धारावीच्या पुनर्विकासावरून अदानी विरोधात उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले. मोठ्या संख्येने बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर ठाकरे यांनी अदानींसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग, तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चढताय? खलबत्ता आहे, […]

धारावीच्या मोर्च्यातून ठाकरे यांनी मारले एका दगडात तीन पक्षी, अदानी, फडणवीस आणि शिंदे टार्गेट
UDDHAV THACKERAY, EKNATH SHINDE, DEVENDR FADNAVIS AND BUILDER ADHANI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : मुंबईतल्या धारावीच्या पुनर्विकासावरून अदानी विरोधात उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले. मोठ्या संख्येने बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर ठाकरे यांनी अदानींसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग, तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चढताय? खलबत्ता आहे, अडकित्ता आहे असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली असा इशारा ठाकरे यांनी दिलाय.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला. धारावीच्या टी जंक्शनपासून निघालेला हा मोर्चा अदानी यांच्या बीकेसी कार्यालयावर धडकला. त्यावेळी ठकारे यांनी फडणवीसांच्या सुपारी टीकेला चोख उत्तर दिलं.

देवेंद्र आणि कंपनी म्हणते उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. पण, मग तुम्ही अदानीचे बूट चाटतायत ते कशासाठी? ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतली आहे. त्या सुपारी बाजांना सांगतोय, त्या दलालांना सांगतोय हा अडकित्ता लक्षात घ्या. किती मोठा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे, अडकित्ता आहे. मुंबईत राहिलं काय? मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा. नासवून टाकायची आणि पुन्हा मुंबईची बदनामी करायची. तुम्ही आमची चौकशी करून पाहिली पण आधी तुमचं सुटलंय ना पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या अशी टीका ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ‘आता यांना पन्नास ठोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला लागले आहेत. यांना पन्नास खोके कमी पडताहेत. यांची मस्ती वाढत चालली आहे. एक तर हे असंविधानिक सरकार आहे. आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. ते खोके कोणी पुरवले असतील? आता तुम्हाला लक्षात आलं असेल. खोके कोणाकडनं गेले असतील? विमानं कोणी पुरवले असतील. हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल? मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही. मग हे सगळं कट कारस्थान शिजवलं. हे सगळे खोके सरकार, खोके सरकार, पन्नास खोके ठोके एकदम ओके हे सगळं कशासाठी कोणासाठी? कोणी दिले? हे आता उघडकीस आलेलं आहे. अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

पुनर्विकासाच्या नावाखाली TDR घोटाळ्याद्वारे धारावी घशात घालत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. तो TDR म्हणजे काय? ते पाहू. TDR म्हणजे transfer of development rights अर्थात हस्तांतरणीय विकास हक्क. एखाद्या बिल्डरला आखून दिलेल्या क्षेत्रफळाएवढं बांधकाम करता येत नसेल तर TDR तयार होतो. तो TDR बिल्डर कुठेही वापरू शकतो.

धारावीच्या उंचीची मर्यादा आहे. त्यामुळे बिल्डरला तेवढं बांधकाम करता येणार नाही. मग अशा वेळी तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक घरं बांधून उर्वरित बांधकाम त्याच महानगरपालिका हद्दीत दुसरीकडे करू शकतो. TDR मधून बिल्डरला कसा फायदा होतो? तर धारावीत flat ची किंमत आणि मुंबईतल्याच दादर परिसरातील flat च्या किंमतीत मोठं अंतर आहे. त्यामुळे धारावीतील TDR दादर सारख्या परिसरात वापरून बांधकाम केलं तर स्वाभाविकपणे बिल्डरचा फायदा होईल.