ठाकरे-पवार माफियांना मदत करतात; 19 बंगल्यांबद्दल का बोलत नाही, राज्यपालांच्या भेटीनंतर सोमय्यांचा सवाल

| Updated on: Feb 23, 2022 | 1:31 PM

किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे या माफियाखोरांना मदत करतात. ते 19 बंगल्यावर का बोलत नाहीत. संजय राऊत यांच्या कोविड हॉस्पिटलबद्दल कोणीच का बोलत नाही. या हॉस्पिटच्या माध्यमातून हजारो जिवांशी खेळण्याचे काम सुजीत पाटकरने केले. त्याबद्दल पवार-ठाकरे का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे-पवार माफियांना मदत करतात; 19 बंगल्यांबद्दल का बोलत नाही, राज्यपालांच्या भेटीनंतर सोमय्यांचा सवाल
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपालांची भेट घेत त्यांना 19 बंगल्यांची माहिती दिली.
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे दोघेही माफियांना मदत करतात. ईडीनी चौकशी सुरू केलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे एकेक प्रकरण आता बाहेर येईल. त्यामुळे मलिक मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत. आता यावर काल उद्धव-राऊत जी ट्यून वाजवत होते, ते आज शरद पवार वाजवतायत. मात्र, त्यांच्यासह स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्या 19 बंगल्यांबाबत काहीच का बोलत नाहीत, असा सवाल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. त्यांनी कार्लाई गावातील या बंगल्याच्या प्रकरणाची माहिती आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भेटून दिल्याचे सांगितले.

काय म्हणाले सोमय्या?

राज्यपालांच्या भेटीनंतर सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे माफियांना पाठिशी घालतात आणि मदत करतात. उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्याचे गौडबंगाल मी आज राज्यपालांना सांगितले आहे. या बंगल्यांचं उद्धव ठाकरेंनी खोटं रेकॉर्ड तयार का केलं, त्याचंक कारण काय. याचा तपास व्हावा, अशी मागणीही यावेळी सोमय्यांनी केली.

का लबाडी करतात?

सोमय्या म्हणाले की, हे त्यांचे बंगले आहेत. ते हक्क सांगतात. कर भरतात. कागदावर बंगले दाखवतात. मात्र, त्याचे गौडबंगाल उघड झाले. त्यामुळे निवडणूक रद्द होणार ही भीती झाली. चौकशी सुरू झाली. त्यानंतर बंगलो नव्हतात, नाही असे रश्मी ठाकरे लिहितात. ते अशी लबाडी करत असतील, तर त्यांना याचे उत्तर जनेतला द्यावे लागेल.

कोविड हॉस्पिटलवर का बोलत नाही?

सोमय्या पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांचे कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकते का, त्यांचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास करावा. टेक्निकल, मोरल पद्धतीने तपास व्हावा. शरद पवार, उद्धव ठाकरे या माफियाखोरांना मदत करतात. ते 19 बंगल्यावर का बोलत नाहीत. संजय राऊत यांच्या कोविड हॉस्पिटलबद्दल कोणीच का बोलत नाही. या हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो जिवांशी खेळण्याचे काम सुजीत पाटकरने केले. त्याबद्दल पवार-ठाकरे का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात