मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या दोन दिवसांपासून युक्तिवाद केला. सिब्बल आजही युक्तिवाद करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कालच्या सुनावणीवेळी गटनेत्याची निवड, प्रतोदची निवड, पक्षप्रमुखांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आदी मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आला. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आलं. आज इतर मुद्द्यांवर सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी
ठाकरे गटाचे वकील मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी भूमिका मांडणार
सत्तासंघर्षाच्या खटल्याची सुनावणी आता पुढील आठवड्यात
पुढच्या आठवड्यातही पुन्हा 3 दिवस सुनावणी होण्याची शक्यता
या आठवड्यात तीन दिवस ठाकरे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली
आता पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार
ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद
नबाम रबिया केसमध्ये ८ महिन्यानंतर जुनं सरकार परत आलं, तसं इथेही येऊ शकतं- सिंघवी
तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही
तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता 39 आमदारांनी हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रदद्द केली असती
तुम्ही राजीनामा दिल्यानं अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?; सरन्यायाधीशांचा सवाल
जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद
कपिल सिब्बल यांनी थेट राज्यपालांचे अधिकार आणि भूमिकेवरच बोट ठेवलं होते
ठाकरे गटाकडून सिंघवी यांचा युक्तीवाद सुरु
सिब्बल यांचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे नेले
राज्यपालांनी नैतिकता पाळायला हवी होती- सिंघवी
राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी चुकीची आहे
आमच्याकडे अजूनही बहुमत आहे
भाजपचं संख्याबळ फक्त 106 आहे. शिंदे फडणवीसांकडे 127 जणांचं बहुमत नाही
मला वाटलं म्हणून मी असं केलं. असं राज्यपाल म्हणू शकत नाही.
राज्यपाल आणि अध्यक्षांकडून सर्व दस्ताऐवज मागवा
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद
राज्यपालांनी सर्व गोष्टी मंत्रिमंडळाला विचारून करायला हव्यात
राज्यपालांनी विद्यमान सरकारला नियम डावलून शपथ दिली
राज्यपालांनी अपात्रतेची नोटीस असलेल्या आमदारांना वगळून बहुमत चाचणी घेणं अपेक्षित होतं
राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करू शकत नाही
एखादा गट राज्यपालांकडे जाणं गरजेचं असतं
आजवर इतिहासात कोणत्याही राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी कुणलााही बोलावलं नाही
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद
सत्तास्थापनेवेळी राज्यपालांची भूमिका संशायस्पद होती
राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला
शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेचे काही आमदार सरकार कसं पाडू शकतात?
शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकतात?
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद
नवी दिल्ली : राज्यपाल यांनी मोठ्या पक्षाला आधी विचारायला हवं होतं – सिब्बल,
सिब्बल हे कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आक्षेप जेठमलानी यांनी घेतला आहे,
सगळ्यात मोठ्या पक्षाला राज्यपाल यांनी बोलवायला हवं होतं – सिब्बल,
गोगावले यांची केलेली प्रतोद म्हणून निवड योग्य आहे का ? – सिब्बल,
ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू.
सिब्बल यांचा युक्तीवादावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला
कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करत आहे- जेठमलानी
राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव व बहुमत चाचणी यांची पत्र होती
राज्यपालांची कार्य, भूमिका यावर युक्तीवाद सुरु आहे
सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करु शकत नाही- सिब्बल
एखादा गट राज्यपालांकडे जाणे गरजेचे असते
राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला
नवी दिल्ली : ठाकरे गटाकडून अभिषेक मनूसिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार,
खासदार अनिल देसाई यांच्यासह वकिल सुप्रीम कोर्टात दाखल,
सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस.
शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं
आज अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार
विद्यमान विधानसभा अध्यक्षांची निवड बेकायदेशीर
मशाल चिन्ह आम्हालाच मिळावं यासाठी याचिका दाखल करणार
ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पार्टीचा आक्षेप
आज सकाळी 11 वाजता समता पार्टी याचिका दाखल करणार
सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आज सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद करण्याची शक्यता
सिब्बल आज कोणते मुद्दे मांडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष