ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा

| Updated on: Apr 02, 2023 | 8:06 AM

माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा
Follow us on

ठाणे : ठाणे ते डोंबिवलीला जाण्यासाठी सध्या दीड तास लागतात. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ जातो. हा वेळ कसा कमी करता येईल, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यावर आता त्यावर उपाय निघालाय. हे प्रवासाचं अंतर लवकरचं कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. डोंबिवलीहून ठाण्याला रस्तामार्गे जाताना उल्हास नदी लागते. ही नदी ओलांडण्यासाठी सद्य:स्थितीत कल्याणच्या दुगार्डी किल्ल्याखेरीज कुठलाही पूल नाही. त्यामुळे वाहनचालकांना मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून दीड तासांचा प्रवास करून यावे लागतो.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार प्रवास

माणकोली ब्रीज हा डोंबिवलीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या पुलामुळे हे दोन्ही शहरांत २० मिनिटांत जाता येणार आहे. या पुलाचे काम गतीने सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पूल सुरू होणार आहे. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

माणकोलीजवळ उभारला जातोय विशेष पूल

हा त्रास दूर करण्यासाठीच राजनोलीपासून जवळपास सहा किमी आधी माणकोलीजवळ विशेष पूल उभारला जात आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल संपणार आहे. या पूल उभारणीनंतर ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. या पुलाचे मूळ नियोजन २०१३ मधील आहे.

९० टक्के काम पूर्ण

२०१६ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ३६ महिन्यांत उभारणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा ब्रिज लोकांसाठी उघडणार आहे.
अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास डोंबिवलीहुन ठाण्याला अवघ्या २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.