TMC : शहरातील विविध कामांची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी, पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

| Updated on: May 30, 2022 | 12:27 AM

पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे दिलेल्या सूचनांनुसार शहरातील स्वच्छता, साफसफाई, ड्रेनेज, गटर्स, रस्त्यांची कामे तसेच सुशोभिकरणाची कामे दर्जेदार तसेच व कामे पूर्ण झाली आहेत की नाही याची पाहणी केली. यामध्ये मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट परिसर, रायलादेवी, रोड नंबर 22, रोड नंबर 16 श्रीनगर तसेच इतर परिसरातील कामांची पाहणी केली.

TMC : शहरातील विविध कामांची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी, पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
शहरातील विविध कामांची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. स्वच्छता, साफसफाई, ड्रेनेज, पदपथ दुरुस्ती तसेच रस्त्यांची कामे तात्काळ करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त यांनी दिले होते. त्यानंतर आज अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे (Sanjay Herwade) यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान सदरची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत विविध ठिकाणाचा पाहणी दौरा केला. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त जी जी गोदेपुरे, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, स्वच्छता निरीक्षक तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

सर्व दुरुस्तीची कामे वेळेत करण्याचे निर्देश

पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे दिलेल्या सूचनांनुसार शहरातील स्वच्छता, साफसफाई, ड्रेनेज, गटर्स, रस्त्यांची कामे तसेच सुशोभिकरणाची कामे दर्जेदार तसेच व कामे पूर्ण झाली आहेत की नाही याची पाहणी केली. यामध्ये मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट परिसर, रायलादेवी, रोड नंबर 22, रोड नंबर 16 श्रीनगर तसेच इतर परिसरातील कामांची पाहणी केली. यामध्ये नालेसफाई, कॅल्व्हर्ट साफसफाई, परिसर सुशोभिकरण, परिसर रंगरंगोटी, पदपथ दुरूस्ती, दुभाजकाची रंगरंगोटी करणे, शहरातील भिंतींचे सौंदर्यीकरण करणे, यासोबतच रायलादेवी तलावाची डागडुजीचे कामे करणे, तलावातील गाळ काढणे, ठिकठिकाणी परिसर सुशोभिकरण करणे, प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्ते दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करणे, रस्ते दुभाजक दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, डेब्रिज उचलणे, रंगरंगोटी वेळेत करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित विभागास दिले. (Additional Commissioner Sanjay Herwade inspected various works in Thane city)

हे सुद्धा वाचा