अंबरनाथच्या बॉडीबिल्डरचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका, बारकू पाड्यातल्या प्रणवचं यश, ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक

| Updated on: Mar 08, 2022 | 9:19 AM

अंबरनाथच्या एका बॉडीबिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत अंबरनाथच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रणव गणेश कोतवाल, असे राष्ट्रीय बॉडीबिल्डरचे नाव आहे. प्रणव याने ज्युनिअर मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रणवच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रणवने घरची बेताची परिस्थिती असूनही सगळे नियम लावून प्रत्येक गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले. त्याच्या मेहनतीने अखेर त्याला यशोशिखरापर्यंत नेलेच.

अंबरनाथच्या बॉडीबिल्डरचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका, बारकू पाड्यातल्या प्रणवचं यश, ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा क्रमांक
Image Credit source: tv9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथच्या (ambarnath) एका बॉडीबिल्डरने (bodybuilder) राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत अंबरनाथच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रणव गणेश कोतवाल, असे राष्ट्रीय बॉडीबिल्डरचे नाव आहे. प्रणव याने ज्युनिअर मिस्टर इंडिया (Bodybuilding Competition) या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रणवच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रणव कोतवाल हा अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात वास्तव्याला आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर गाठलेले यशाचे शिखर आणि त्याने केलेली मेहनत, ही त्याच्या श्रेयात मोलाची ठरली आहे. बॉडीबिल्डिंग हा खूप खर्चीक खेळ मानला जातो. त्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो, योग्यवेळी व्यायाम करावा लागतो. पण, प्रणवने घरची बेताची परिस्थिती असूनही सगळे नियम लावून प्रत्येक गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले. त्याच्या मेहनतीने अखेर त्याला यशोशिखरापर्यंत नेलेच.

मेहनतीने गाठले यशोशिखर

परिस्थिती बेताची असली तरी त्यावर मार्ग काढून अनेकांनी यशोशिखर गाठल्याचे आपण पाहिले असतील. अशीच परिस्थिती प्रणवची देखील होती. प्रणवचे वडील भिक्षुकी करतात. मात्र, तरीही अतिशय सामान्य परिस्थितीत त्याच्या आई-वडिलांनी त्याला खंबीरपणे साथ दिली. आई वडिलांचा पाठींबा, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनत याच्या जोरावर प्रणवने नुकत्याच झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेतील 70 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचंच नव्हे, तर संपूर्ण अंबरनाथ शहराचे नाव देशापातळीवर पोहचले आहे. प्रणवने बेताच्या परिस्थितीतून गाठलेलं यशोशिखर कौतुकास पात्र आहे.

मेहनत केल्यास यश निश्चित

मेहनत केल्यास यश निश्चित मिळते. त्याचीच प्रचिती राष्ट्रीय बॉडीबिल्डर प्रणव कोतवाल याच्या यशातून येते. प्रणवसमोर अनेक संकटे असूनही त्याने परिस्थितीशी दोन हात करुन आपले यशोशिखर गाठले. स्वप्न मोठे असले आणि प्रयत्न केले की यश गाठता येते, असे अनेकदा म्हटले जाते. बॉडीबिल्डर प्रणवने आपले प्रयत्न सोडले नाही. त्याने सर्व नियम, आहार पाळून आपली कुच यशाकडे केली आणि अखेर त्याला ज्युनियर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेतील 70 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मेहनतीने मिळाला आहे. प्रणवने बेताच्या परिस्थितीतून गाठलेलं यशोशिखर कौतुकास पात्र आहे.

इतर बातम्या

कपिल पाटलांची भाषणं दोन दिवस यूट्यूबवर ऐकत होतो, पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची मिश्किल टिपणी

VIDEO | माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी