ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली

| Updated on: Jul 19, 2021 | 2:34 PM

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठाण्याला झोडपले आहे. त्यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. (ashraf shanu pathan)

ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली
ashraf shanu pathan
Follow us on

ठाणे: सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठाण्याला झोडपले आहे. त्यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. याची माहिती मिळताच ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पठाण यांनी शिळ गावातील संरक्षक भिंत तोडली. भर पावसात कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी ही भिंत तोडून टाकली. त्यामुळे या ठिकाणची पूरपरिस्थिती टळली आहे. (ashraf shanu pathan break wall to relief people from flood in thane)

ठाणे शहरातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिळफाटा येथे तर सलग दोन दिवस पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिळ गावामधील दोस्ती वसाहतीसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे भला मोठा ओढा बुजविण्यात आला आहे. परिणामी, पूरस्थिती निर्माण होत असल्याने विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी कंबरभर पाण्यातून वाट काढीत ही भिंतच पाडू टाकली. त्यामुळे या भागातील सुमारे 300 ते 400 कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

जीवाची पर्वा न करता बाहेर पडले

शिळ गावानजीक दोस्ती गृहसंकुलाच्या उभारणीवेळी नैसर्गिक ओढा बुजवण्यात आला होता. हा ओढा बुजविण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी, डोंगरदर्‍यातून वाहून आलेले पाणी परिसरात जमा झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याच भागातील साई टॉवर या वसाहतीलाही धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच जीवाची पर्वा न करता अशरफ शानू पठाण यांनी गणेश मुंढे, दिनेश, कैलाश, फरहान यांच्यासह कंबरभर पाण्यातून वाट काढीत दोस्ती वसाहत गाठली. अन् पाण्याची अडवणूक करणारी भिंत पाडली.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

एमएमआरडीए, ठामपाचे शहर विकास यांनी जाणीवपूर्वक या ओढ्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बंद केले जात असताना पालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवाल करून संबधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे. (ashraf shanu pathan break wall to relief people from flood in thane)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

Mumbai Rains Live Updates | बोरिवली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्ते जलमय

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी

(ashraf shanu pathan break wall to relief people from flood in thane)