‘देशद्रोही ठरवा, नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत कंगनाला देशात स्थान नको,’ बड्या मंत्र्याचे वक्तव्य

| Updated on: Nov 14, 2021 | 9:33 PM

कंगना रनौतला देशद्रोही ठरवून या देशातून तडीपार केले पाहिजे. ती जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही; तोपर्यंत तिला देशात स्थान दिलेच नाही पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणार्‍या कंगनाविरोधात सर्व राज्यकीय पक्षांनी एकत्र येऊन तिच्यावर कारवाई केली पाहिजे," अशी रोखठोक भूमिका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडली.

देशद्रोही ठरवा, नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत कंगनाला देशात स्थान नको, बड्या मंत्र्याचे वक्तव्य
KANGANA RANAUT
Follow us on

ठाणे : “कंगना रनौतला देशद्रोही ठरवून या देशातून तडीपार केले पाहिजे. ती जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही; तोपर्यंत तिला देशात स्थान दिलेच नाही पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणार्‍या कंगनाविरोधात सर्व राज्यकीय पक्षांनी एकत्र येऊन तिच्यावर कारवाई केली पाहिजे,” अशी रोखठोक भूमिका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडली. ते ठाण्यात बोलत होते.

जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही…

“कंगना रनौतला देशद्रोही ठरवून या देशातून तडीपार केले पाहिजे. ती जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही; तोपर्यंत तिला देशात स्थान दिलेच नाही पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणार्‍या कंगणाच्या विरोधात सर्व राज्यकीय पक्षांनी एकत्र येऊन तिच्यावर कारवाई केली पाहिजे. पण, आपल्या देशात अशा पद्धतीने राजकीय पक्ष एकत्र येत नाहीत, हे दुर्देवं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशात अशा विषयांना अधिक महत्त्व दिले जात आहे. इथे मंदिर, मशीद, कंगना अशा विषयांवर चर्चा घडविली जात आहे. मात्र गरिबी, रोजगार, शेतकर्‍यांचे प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न यावर चर्चाच होत नाही याचे वाईट वाटते, असे बच्चू कडू म्हणाले.

महिनाभरात बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यात येतील

याआधी गटई चर्मकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटई कामगार, आदिवासी, तुर्फेपाडा येथील झोपडपट्टीवासीयांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना “माझे ठाणे पालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. या संदर्भात आगामी महिनाभरात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यात येतील. जयस्वाल आयुक्त असताना मी येथे आलो होतो. त्यावेळी ठाण्यातील दिव्यांगांच्या स्टॉलचा आणि घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला होता. 25 ते 30 टक्के दिव्यांगांना घर स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर चर्मकारांच्या समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन चर्मकारांचे स्टॉल, पीच परवाना, आणि इतर समस्यांवर मार्ग काढण्यात येईल,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.

कंगना रनौत काय म्हणाली होती ?

कंगनाने ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर एक मुलाखत दिली होती. यावेळी ‘रक्त वाहणारच होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं आहे,’ असं कंगना म्हणाली होती.

इतर बातम्या :

कारखानदारी हा धंदा आहे, राजकारण नाही; शरद पवारांचे निफाडमध्ये वक्तव्य

Video | काँग्रेसच्या आंदोलनात मानापमान नाट्य, ट्रकवर चढण्यावरून भाई जगताप-झिशान सिद्दीकी भिडले

व्होटर कार्ड हरवले? आता नो टेन्शन, घरबसल्या बनवा दुसरं व्होटर कार्ड, प्रक्रिया काय?