सध्या बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे. अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी बांग्लादेशमध्ये अजूनही हिंसक कारवाया सुरु आहेत. बांग्लादेशात लष्करही हतबल स्थितीमध्ये आहे. बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले होत आहेत. त्यांची घर, दुकानांना लक्ष्य केल जातय. मागच्या आठवड्यात बांग्लादेशात स्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांग्लादेशात निर्माण झालेल्या या अराजकतेचा सीमेवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे BSF हाय अलर्टवर आहे.
संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीच्या कोन गावातील ग्रामस्थ बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई असल्याचे बॅनर गावात लागले आहेत. आपला गाव आपली जबाबदारी, अशी लोक गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे बॅनरच्या माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. कोनगाव ग्रामस्थांकडून गावात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरचे स्टेटस व्हॉट्सअप डीपी वर ठेवत जनजागृती करण्यात आली आहे.
नेमका काय लिहिला आहे मजकूर
“रोहिग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. अशी लोक गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करावा. भाईचारा (बंधु-बधुता) करणाऱ्या लोकांनी आपला ज्ञान आपल्या जवळच ठेवावे. आपला गाव आपली जबाबदारी”